बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Munawar Faruqui : “कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण…”, कोकणी माणसाला शिवी व खिल्ली उडवल्यानंतर मुनव्वर फारुकीची माफी, म्हणाला, “त्यावेळी मला…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 13, 2024 | 11:53 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Munawar Faruqui apologized after insulting and marathi kokani people know more what he said

कोकणी माणसाचा अपमान केल्यानंतर मुनव्वर फारुकीचा माफीनामा, व्हिडीओ शेअर करत मागितली माफी

Munawar Faruqui Apologized : स्टॅन्ड अप कॉमेडियन व ‘बिग बॉस १७’ चा विजेता मुनव्वर फारुकी हा सतत वादग्रस्त वक्तव्ये करत असतो. त्याच्या स्टॅन्ड अप कॉमेडी कार्यक्रमात तो उपस्थित प्रेक्षकांना टोमणे मारून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. यातूनही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. अशातच तो पुन्हा एकदा वादाचे कारण बनला आहे आणि हे कारण म्हणजे त्याने मराठी माणसाविरुध्द केलेलं वादग्रस्त वक्तव्य. नुकतंच त्याने त्याच्या एका स्टॅन्ड अप कार्यक्रमात कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरले होते. या जोकची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे मुनव्वरवर जोरदार टीका झाली. कोकणीव मराठी माणसाचा अपमान केल्यानिमित्त त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांनीही त्याच्यावर कारवाईची मागणी केली. (Munawar Faruqui Apologized)

मुनव्वरने वापर केलेल्या शब्दप्रयोगामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. कोकणी माणसाविषयी उल्लेख करताना मुनव्वरने शिवीचा वापर केला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात मनसे आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे नितेश राणे यांनीदेखील त्याला इशारा दिला होता. हा वाद चिघळल्यानंतर मुनव्वरने माफी मागितली आहे. माफी मागताना मुनव्वरने ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांच्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. मुनव्वरने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत कोकणी माणसाची जाहीर माफी मागितली आहे. “मी कोकणची टिंगल उडवली आहे. पण तसं नाही. माझा तो हेतू नव्हता”, असं स्पष्टीकरण देत मुनव्वरने सर्वांची जाहीर माफी मागितली आहे.

कोकणावर खूप खूप प्रेम आणि माझी माफी❤️ pic.twitter.com/pUSPYuZ9Kf

— munawar faruqui (@munawar0018) August 12, 2024

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “हिला भीक म्हणून कॅप्टन्सी दिली”, जान्हवी काही सुधरेना, निक्कीनेही दिली तितकीच साथ, अंकिताला बेअक्कलही म्हणाले अन्…

मुनव्वर फारुकीने त्याच्या सोशल मीडिया एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात प्रेक्षकांबरोबर काही संवाद सुरु होता, तो जोकही नव्हता. त्याचवेळी कोकणाचा काहीतरी विषय निघाला. मला माहिती आहे की, तळोज्यात खूप कोकणी लोक राहतात आणि माझे खूपही मित्र तिथे राहतात. लोकांना असं वाटतं की, मी कोकणी लोकांची आणि कोकणाची मस्करी केली. पण माझा तसा कोणाताही हेतू नव्हता. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, पण तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. मी तेव्हा वक्तव्य केलं तेव्हा त्या लोकांनी एन्जॉय केले होते. कार्यक्रमाला सर्व लोक होते. मराठी, हिंदू व मुस्लिम असे सगळे लोक तिथे होते. पण आता इंटरनेटवर अशाप्रकारच्या गोष्टी आल्यावर मला माहिती पडलं. त्यामुळे मी मनापासून सर्वांची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र”

आणखी वाचा – Munawar Faruqui : कोकणी माणसांना शिवी दिली, खिल्ली उडवली अन्…; मुनव्वर फारुकीच्या ‘त्या’ वक्तव्यावर वाद, मनसे आक्रमक

दरम्यान, मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस १७’मुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत आला होता. परंतु, त्याने लोकांची मने जिंकली आणि ट्रॉफी पटकावण्यात तो यशस्वी ठरला. ‘बिग बॉस १७’ जिंकल्यानंतर मुनव्वर आपल्या स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेत परतला. पण, आता तो पुन्हा वादात अडकला आहे. मुनव्वर याच्या या विनोदाचा मनसेनेही निषेध केला असून, मुनव्वर आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अशा अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिला आहे.  

Tags: entertainment newsMunawar Faruqui
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Tharala Tar Mag Serial Update

Tharala Tar Mag Serial :  प्रतिमाची स्मृती परत येणार का?, तन्वीची अस्वस्थताही वाढली अन्…; खरं सत्य येणार का समोर?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.