शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रियांका चोप्राची लेक आहे फारच हुशार, दोन वर्षाची मालती शिकत आहे डान्स, ‘ते’ दृश्य पाहून नेटकरीही हैराण

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 7, 2024 | 1:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
priyanka chopra daughter dance

प्रियांका चोप्राची लेक घेतेय नृत्याचे धडे

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक बॉलिवूड तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती अधिकतर हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसून येते. तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळते. प्रियांका २०१८ साली गायक निक जोनासबरोबर लग्नबंधनात अडकली. जोधपुर येथील उमेद भवन पॅलेस येथे हिंदू व ख्रिश्चन पद्धतिने लग्नबंधनात अडकले. त्यानंतर २०२२ साली त्यांनी सरोगसी पद्धतीने मुलीला जन्म दिला. मालती-मेरी असे तिने मुलीचे नाव ठेवले. मालतीचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील समोर येताना बघायला मिळतात. अशातच आता मालतीबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. (priyanka chopra daughter dance)

प्रियांका व निकची मुलगी मालतीदेखील सोशल मीडियावर अधिक प्रसिद्ध आहे. प्रियाकाने नुकताच मालतीचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मालती एका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे. तसेच एका डान्स क्लासमध्ये असून प्रियांकाने फोटो अपलोड केला आहे. ती यामध्ये बॅलेट डान्स करताना दिसत आहे. तसेच गुलाबी रंगाचा पूर्ण ड्रेस, पायात मोजे घातले आहेत. मालती सध्या दोन वर्षांची आहे. त्यामुळे इतक्या कमी वयात नृत्याचे धडे घेताना बघून प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

आणखी वाचा – रिचा चड्डा व अली फजलने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Patty Cardona (@jerryxmimi)

मालतीचा फोटो समोर आल्यानंतर तीदेखील आई-वाडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन क्षेत्रात काम करणार अशी शक्यतादेखील सगळेजण व्यक्त करताना दिसत आहेत. मालतीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मालतीच्या फोटोवर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी प्रेम व्यक्त केले आहे. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “कीती गोड दिसत आहे मालती”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “आईसारखीच लेक होणार”, त्याचप्रमाणे अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “आई-बाबासारखी हीदेखील मोठी स्टार होणार”.    

आणखी वाचा – “स्त्रीत्व उत्तेजित पद्धतीने दाखवण्याला विरोध अन्…”, नीना कुळकर्णींनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाल्या, “थोबाडीत देईन…”

दरम्यान प्रियांकाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती ‘सिटाडेल २’ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तसेच हॉलिवूड चित्रपट ‘हेड्स ऑफ स्टेट’मध्येदेखील दिसणार आहे. सध्या ती कुटुंबाबरोबर लॉस एंजलिस येथे राहत आहे.

Tags: daughternick jonaspriyanka chopra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Itsmajja and Kori Pati Production upcoming and awaited series Dahavi-A wrapped up and the shooting started.

अखेर प्रतिक्षा संपली! 'आठवी अ'च्या भरघोस यशानंतर 'दहावी अ' प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मुहूर्त सोहळा संपन्न, उत्सुकता शिगेला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.