Richa Chadha and Ali Fazal Baby Girl Name : ऋचा चढ्ढा व अली फजल यांनी १६ जुलै रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाद्वारे बाळाची पहिली झलक दाखवली. यानंतर आता ऋचा व अलीने त्यांच्या लेकीचं नाव नेमकं काय ठेवलंय याचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव झुनेरा इदा फजल ठेवल्याचा खुलासा केला आहे. व्होगला दिलेल्या मुलाखतीत, दोघांनी पालकत्वाबद्दल भाष्य केलं आणि त्यांच्या लेकीच्या नावाचा खुलासा केला. रिचा चड्ढा व अली फझल यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या फोटोंवरुन पालक झाल्यानंतरचा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यावेळी बोलताना अली फझल म्हणाला, “बाळ होणे ही प्रत्येकाची पोकळी भरुन काढते ज्याची तुम्हाला जाणीवही नाही. हा भाग मला आश्चर्यचकित करत नाही. आता हे काम करणे कठीण आहे. जेव्हा मी घर सोडतो तेव्हा मला खूप चिंता वाटते कारण मला फक्त तिला पाहायचे आहे. माझे बाळ झुनेरा नेहमी ऋचा आणि माझ्या आसपास असते”.
१६ जुलै रोजी सामायिक केलेल्या संयुक्त निवेदनात, जोडप्याने म्हटले, “१६ जुलै २०२४ रोजी आमच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. आमचं कुटुंब प्रचंड आनंदी आहे. आम्ही आमच्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कायम आभारी आहोत. आशीर्वाद, ऋचा चढ्ढा आणि अली फजल”. या जोडप्याने त्यांच्या लहान मुलाची पहिली झलक इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले, “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सहयोगाची घोषणा करण्यासाठी एक सहयोग पोस्ट करत आहे!! आम्ही खरोखरच धन्य झालो आहोत. आमची मुलगी आम्हाला खूप व्यस्त ठेवते. त्यामुळे, तुमच्या प्रेम व आशीर्वादाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.”
आणखी वाचा – “हिंदू आहे म्हणून बिनधास्त काम केलं”, एकता कपूरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “तुम्ही धर्मनिरपेक्ष करत…”
जवळपास आठ वर्षे डेटिंग केल्यानंतर रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केले. नंतर त्यांनी दिल्लीत हळदी आणि संगीत समारंभ आणि २०२२ मध्ये मुंबईत रिसेप्शनसह त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे हे क्षण एन्जॉय केले. या जोडप्याने या वर्षी १६ जुलै रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत केले. दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, रिचा चड्ढा अखेरची संजय लीला भन्साळीच्या ‘हीरामंडी’मध्ये दिसली होती. दुसरीकडे अली फजलने ‘मिर्झापूर ३’ मध्ये कामाला सुरुवात केली.