बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक बॉलिवूड तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती अधिकतर हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसून येते. तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळते. प्रियांका २०१८ साली गायक निक जोनासबरोबर लग्नबंधनात अडकली. जोधपुर येथील उमेद भवन पॅलेस येथे हिंदू व ख्रिश्चन पद्धतिने लग्नबंधनात अडकले. त्यानंतर २०२२ साली त्यांनी सरोगसी पद्धतीने मुलीला जन्म दिला. मालती-मेरी असे तिने मुलीचे नाव ठेवले. मालतीचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील समोर येताना बघायला मिळतात. अशातच आता मालतीबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. (priyanka chopra daughter dance)
प्रियांका व निकची मुलगी मालतीदेखील सोशल मीडियावर अधिक प्रसिद्ध आहे. प्रियाकाने नुकताच मालतीचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मालती एका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे. तसेच एका डान्स क्लासमध्ये असून प्रियांकाने फोटो अपलोड केला आहे. ती यामध्ये बॅलेट डान्स करताना दिसत आहे. तसेच गुलाबी रंगाचा पूर्ण ड्रेस, पायात मोजे घातले आहेत. मालती सध्या दोन वर्षांची आहे. त्यामुळे इतक्या कमी वयात नृत्याचे धडे घेताना बघून प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
मालतीचा फोटो समोर आल्यानंतर तीदेखील आई-वाडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन क्षेत्रात काम करणार अशी शक्यतादेखील सगळेजण व्यक्त करताना दिसत आहेत. मालतीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मालतीच्या फोटोवर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी प्रेम व्यक्त केले आहे. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “कीती गोड दिसत आहे मालती”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “आईसारखीच लेक होणार”, त्याचप्रमाणे अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “आई-बाबासारखी हीदेखील मोठी स्टार होणार”.
दरम्यान प्रियांकाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती ‘सिटाडेल २’ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तसेच हॉलिवूड चित्रपट ‘हेड्स ऑफ स्टेट’मध्येदेखील दिसणार आहे. सध्या ती कुटुंबाबरोबर लॉस एंजलिस येथे राहत आहे.