बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्रींमध्ये परिणीती चोप्राचे नाव आवर्जून घेतले जाते. २४ सप्टेंबर २०२३ रोजी ती ‘आम आदमी’ पक्षाचे नेते राघाव चढ्ढाबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर अनेकदा तिने तिचे व राघवचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघेही खूप फिरताना दिसतात. अशातच परिणीती गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. त्यावरून तिने आता संताप व्यक्त केला आहे. (pariniti chopra instagram story)
नुकतीच परिणीती मुंबई एअरपोर्टवर मोठा पांढऱ्या सैलसर शर्ट व जीन्समध्ये दिसली. त्यामुळे ती गरोदर असण्याचा चर्चा जोरात सुरु झाल्या. पण या सर्व चर्चांवर परिणीतीने स्वतःच मौन सोडलं आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत सर्वांना उत्तर दिले आहे.

तिने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले की, “काफ्तान ड्रेस = प्रेग्नंसी, ओव्हरसाईज शर्ट = प्रेग्नंसी व कॉम्फी इंडियन कुर्ता = प्रेग्नंसी”, असे लिहून तिने हसण्याची इमोजी ठेवली. दरम्यान तिच्या या स्टोरीवर अनेक ठिकाणी चर्चा होत आहे. तिच्या या स्टोरीवरुन ती गरोदर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपट ‘चमकीला’ वर लक्ष देत आहे.
या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर सुप्रसिद्ध पंजाबी गायक व अभिनेता दिलजित दोसांज दिसणार आहे. हा चित्रपट पंजाबी सुपरस्टार गायक चमकिला यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेला असून त्यांचा मंचावरच खून करण्यात आला होता. या चित्रपटाचा ट्रेलर २८ मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
परिणीतीने २०११ साली ‘लेडीज vs रिक्की बहल’ या चित्रपटामधून तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. दरम्याने तिने राघवबरोबर लग्न केले तेव्हा तिचे राजकारण्याशी लग्न करणार नाही असे एक विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. राघव व परिणीतीच्या डेटिंगच्या चर्चा अधिक सुरु झाल्या होत्या. मात्र या चर्चाना दुजोरा देत दोघेही लग्नबंधनात अडकले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. लग्न झाल्यानंतर परिणीती चित्रपटांपासून थोडी दूर राहू लागली. पण आता तिच्या येत असलेल्या चित्रपटामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.