पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत राहिला. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबरच्या तिच्या नात्यामुळे तो बराच चर्चेत आला. शोएबने त्याची दुसरी पत्नी सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर शोएबने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १९ जानेवारी २०२४ रोजी पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. शोएब व सानियाच्या ब्रेकअपमुळे अनेक चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. तर एकीकडे क्रिकेटर त्याच्या तिसऱ्या पत्नीवर भरभरुन प्रेमही व्यक्त करताना दिसला. नुकताच शोएबने त्याची पत्नी सनाचा वाढदिवस साजरा केला आहे. (Sana Javed Birthday)
शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर वाढदिवस साजरा केल्या नंतरचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. सना व शोएबमधील केमिस्ट्री या फोटोंवरून पाहायला मिळत आहे. सनाचा पती शोएबनेही बायकोचा वाढदिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. वाढदिवसादिवशी खास सजावट केली असल्याचं पाहायला मिळालं. लाल व काळ्या फुग्यांची सुंदर सजावट या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
वाढदिवसादिवशी शोएबने बायकोला लाल गुलाब दिले.त्यानंतर दोघांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये शोएब आपल्या नवविवाहित पत्नीला प्रेमाने केक भरवताना दिसत आहे. यादरम्यान सना व शोएबने एकमेकांबरोबर बराच वेळ एकत्र घालवला. सनाच्या वाढदिवसाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे खास फोटो शेअर करत सनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “फक्त आम्ही दोघे”. सनाने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत मरुन रंगाचा स्लीव्हलेस ड्रेस परिधान केला होता. अभिनेत्रीचा हा पारंपरिक अंदाज खूप खास दिसत होता.
सनाचा जन्म सौदी अरेबियामध्ये झाला असून तिने २०१२ मध्ये ‘शहर-ए-जात’ या मालिकेतून अभिनेत्री म्हणून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. ‘खानी’, ‘रुसवाई’, ‘जरा याद कर’ आणि ‘डंक’ यांसारख्या पाकिस्तानी शोमधून अभिनेत्रीला खूप लोकप्रियता मिळाली. ‘डंक’मध्ये नकारात्मक भूमिका असूनही तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.