शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाला वर्ष होण्यापूर्वीच परिणीती चोप्रा गरोदर?, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “प्रेग्नंसी आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 28, 2024 | 6:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
pariniti chopra instagram story

लग्नाला वर्ष होण्यापूर्वीच परिणीती चोप्रा गरोदर?, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, "प्रेग्नंसी आणि..."

बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्रींमध्ये परिणीती चोप्राचे नाव आवर्जून घेतले जाते. २४ सप्टेंबर २०२३ रोजी ती ‘आम आदमी’ पक्षाचे नेते राघाव चढ्ढाबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर अनेकदा तिने तिचे व राघवचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघेही खूप फिरताना दिसतात. अशातच परिणीती गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. त्यावरून तिने आता संताप व्यक्त केला आहे. (pariniti chopra instagram story)

 नुकतीच परिणीती मुंबई एअरपोर्टवर मोठा पांढऱ्या सैलसर शर्ट व जीन्समध्ये दिसली. त्यामुळे ती गरोदर असण्याचा चर्चा जोरात सुरु झाल्या. पण या सर्व चर्चांवर परिणीतीने स्वतःच मौन सोडलं आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत सर्वांना उत्तर दिले आहे.

आणखी वाचा – Video : बऱ्याच दिवसांनी बायको-लेकासह पुण्याच्या घरी पोहोचला शशांक केतकर, आईने बनवली सालपापडी, म्हणाला, “तांदूळ भिजवून…”

तिने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले की, “काफ्तान ड्रेस = प्रेग्नंसी, ओव्हरसाईज शर्ट = प्रेग्नंसी व कॉम्फी इंडियन कुर्ता = प्रेग्नंसी”, असे लिहून तिने हसण्याची इमोजी ठेवली. दरम्यान तिच्या या स्टोरीवर अनेक ठिकाणी चर्चा होत आहे. तिच्या या स्टोरीवरुन ती गरोदर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपट ‘चमकीला’ वर लक्ष देत आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारबरोबर साखरपुडा मोडल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली होती वाईट अवस्था, आत्महत्येचाही प्रयत्न, म्हणालेली, “आमच्या दोघांमध्ये…”

या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर सुप्रसिद्ध पंजाबी गायक व अभिनेता दिलजित दोसांज दिसणार आहे. हा चित्रपट पंजाबी सुपरस्टार गायक चमकिला यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेला असून त्यांचा मंचावरच खून करण्यात आला होता. या चित्रपटाचा ट्रेलर २८ मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

परिणीतीने २०११ साली ‘लेडीज vs रिक्की बहल’ या चित्रपटामधून तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. दरम्याने तिने राघवबरोबर लग्न केले तेव्हा तिचे राजकारण्याशी लग्न करणार नाही असे एक विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. राघव व परिणीतीच्या डेटिंगच्या चर्चा अधिक सुरु झाल्या होत्या. मात्र या चर्चाना दुजोरा देत दोघेही लग्नबंधनात अडकले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. लग्न झाल्यानंतर परिणीती चित्रपटांपासून थोडी दूर राहू लागली. पण आता तिच्या येत असलेल्या चित्रपटामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

Tags: instagram storypariniti choprapregnancyRaghav Chaddharumors
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“प्रकरण दाबलं तर पुन्हा पैसा व पद…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य, म्हणाली, “आरोपींना…”

मे 23, 2025 | 12:35 pm
Next Post
Sana Javed Birthday

सानिया मिर्झाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर असं आयुष्य जगत आहे शोएब मलिक, दुसऱ्या पत्नीबरोबरचे 'ते' फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.