बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन सृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत राहिल्या आहेत. अशातच त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Neena Gupte Marriage Photo)
नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांचं अफेअर जगजाहीर होतं. मसाबा गुप्ता ही या दोघांचीच मुलगी आहे. मात्र विवियन यांनी नीना यांच्याशी लग्न केलं नव्हतं. मुलगी मोठी झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. या लग्नाचा फोटो त्यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केला आहे. २००८ मध्ये त्यांनी दिल्लीतील चार्टर्ड अकाऊंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांनी या अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – हेमा मालिनीच्या लेकीचा घटस्फोट होणार?, ईशा देओलच्या नवऱ्याचं सुरु आहे अफेअर, फसवणूक केली अन्…
या फोटोमध्ये नीना गुप्ता यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे. तर त्यांच्या बाजूला विवेक मेहरा बसले आहेत. या फोटोमध्ये त्यांची लेक मसाबादेखील दिसत आहे. लग्नाचे विधी सुरु असताना मुलगी मसाबा गुप्ता ही आई-वडिलांच्या डोक्यावर छत्री घेऊन उभी असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. ‘माझ्या साध्या लग्नाचा फोटो’ असं कॅप्शन देत नीना यांनी हा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, वयाच्या ५४ व्या वर्षी नीना गुप्ता यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. या अभिनेत्रीने विवेक मेहराबरोबर दुसरे लग्न केले आहे. मात्र अभिनेत्रीने पहिल्यांदाच त्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्यांच्या लग्नाच्या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.