रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नीना गुप्तांनी पहिल्यांदाच शेअर केला दुसऱ्या लग्नाचा फोटो, लग्नात लेकही होती उपस्थित अन्…; फोटो तुफान व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 18, 2024 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actress neena gupta first time shared her second marriage picture daughter masaba also spotted in it

नीना गुप्तांनी पहिल्यांदाच शेअर केला दुसऱ्या लग्नाचा फोटो, लग्नात लेकही होती उपस्थित अन्...; फोटो तुफान व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन सृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत राहिल्या आहेत. अशातच त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Neena Gupte Marriage Photo)

नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांचं अफेअर जगजाहीर होतं. मसाबा गुप्ता ही या दोघांचीच मुलगी आहे. मात्र विवियन यांनी नीना यांच्याशी लग्न केलं नव्हतं. मुलगी मोठी झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. या लग्नाचा फोटो त्यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केला आहे. २००८ मध्ये त्यांनी दिल्लीतील चार्टर्ड अकाऊंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांनी या अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – हेमा मालिनीच्या लेकीचा घटस्फोट होणार?, ईशा देओलच्या नवऱ्याचं सुरु आहे अफेअर, फसवणूक केली अन्…

या फोटोमध्ये नीना गुप्ता यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे. तर त्यांच्या बाजूला विवेक मेहरा बसले आहेत. या फोटोमध्ये त्यांची लेक मसाबादेखील दिसत आहे. लग्नाचे विधी सुरु असताना मुलगी मसाबा गुप्ता ही आई-वडिलांच्या डोक्यावर छत्री घेऊन उभी असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. ‘माझ्या साध्या लग्नाचा फोटो’ असं कॅप्शन देत नीना यांनी हा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – प्रथमेश परबची होणारी बायको करत असलेलं काम पाहून तुम्हीही कराल तोंडभरुन कौतुक, उच्चशिक्षित आहे अन्…; म्हणाली, “गरीब मुलांसाठी…”

दरम्यान, वयाच्या ५४ व्या वर्षी नीना गुप्ता यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. या अभिनेत्रीने विवेक मेहराबरोबर दुसरे लग्न केले आहे. मात्र अभिनेत्रीने पहिल्यांदाच त्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्यांच्या लग्नाच्या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Tags: नीना गुप्तामनोरंजन बातमीबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंजनbollywood actressBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsneena gupta
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Bigg Boss 17 contestants list and more in marathi

"सुशांतच्या निधनानंतर तू…", एक्स बॉयफ्रेंडवरुन विकी जैनने अंकिता लोखंडेला सुनावलं, म्हणाला, "कोणालाही तुझ्यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.