ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र व ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी तिच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. अलीकडेच ईशा देओलबाबत समोर आलेल्या एका बातमीने सर्वांनाचं आश्चर्य वाटले आहे. काही मीडिया रिपोर्टसनुसार, अभिनेत्री पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. ईशा देओल व तिचा पती भरत तख्तानी यांच्या नात्यात दुरावा आल्याचं समोर आलं आहे. (Esha Deol Separated From Husband Bharat Takhtani)
बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, ईशा व भरत कोणत्याही पार्टी किंवा इव्हेंटमध्ये एकत्र दिसून आलेले नाहीत. तसेच एकमेकांबरोबचे फोटोही त्यांनी शेअर केलेले नाहीत. ईशाचा पती भरत याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे. याच कारणाने त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. भरतची गर्लफ्रेंड बंगळूरमध्ये राहणारी आहे.
एका नेटकऱ्याने नवीन वर्षाच्या दिवशी बेंगळुरूमध्ये एका पार्टीत ईशाचा पती भरतला त्याच्या एका मैत्रिणीबरोबर पाहिले असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भरतची मैत्रीण ही बंगळुरूमध्येच राहत असल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्याप देओल कुटुंबियांनी यासंदर्भात कुठलीच अधिकृत माहिती दिलेली नाही.
अशातच ईशा व भरत यांचा घटस्फोट होणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी भरतला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यावर एकाने असे म्हटले आहे की, “भरतला बघून असे वाटले की, तो त्याच्या कुटुंबावर व पत्नीवर खूप प्रेम करतो. पण तसे काहीच नाही असे आता वाटत आहे.” तर दुसर्याने असे म्हटले आहे की, “ज्या गोष्टी तिच्या आईबरोबर घडल्या आहेत, त्या ईशाच्या बाबतीत घडू नयेत.”
दरम्यान, ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी भरतशी लग्न केले होते. दोघांचे ईस्कोन मंदिरात अत्यंत साधेपणाने लग्न पार पडले होते. लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांनी राध्याला जन्म दिला आणि त्यानंतर २०१९ मध्ये ईशाने त्यांची दुसरी मुलगी मिराया तख्तानीला जन्म दिला.