दोन महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री मलायका आरोराच्या वडिलांचे निधन झाले. राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी घेत त्यांनी आत्महत्या केली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर मलायकावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी तिने सोशल मीडियावर एकच पोस्ट केली होती. यामध्ये तिने वडिलांसाठी प्रार्थना सभा आयोजित केली असल्याचे सांगितले होते. या प्रार्थनासभेसाठी बॉलिमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर मलायका सोशल मिडियावर अधिक सक्रिय नव्हती. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मलायका मात्र वाडिलांच्या मृत्यूनंतर शांत असलेली पाहायला मिळाली. आशातच तिची एक मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (malaika arora on fathers)
वडिलांच्या निधनानंतर मलायकाने आता व्यक्त झाली आहे. ती वडिलांच्या आठवणीत म्हणाली की, “आपण सगळ्यांनी आयुष्यात पुढे जावं. माझ्या वडिलांना माझ्याकडून हेच हवं होतं. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही गोष्ट स्वीकारण्यासाठी मला खूप वेळ गेला. हे सगळं आमच्यासाठी खूप कठीण होतं. पण ठीक होण्यासाठी स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे”.
पुढे ती म्हणाली की, “कामावर परतण्यासाठी स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम असणेदेखील खूप गरजेचे आहे. या सगळ्याबरोबर आम्हाला आईचीदेखील काळजी घ्यायची आहे. मी काही ब्रॅंडसाठी काम करत आहे. तसेच मी माझ्या वडिलांसाठीही काही काम करत आहे”.
दरम्यान मलायकाच्या वडिलांचे ११ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. या घटणेमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्याआधी एक दिवस अमृता व मलायका दोघीही आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना इमारतीखाली स्पॉटदेखील केले गेले. मात्र वडिलांच्या निधनादिवशी अर्जुन कपूरदेखील तिच्या बरोबर नेहमी दिसून आला. काही महिन्यांपूर्वी दोघंही विभक्त झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन अर्जुन तिच्या बरोबर दिसून आला. अंतिम संस्कारापासून प्रार्थनासभेपर्यंत तो तिच्याबरोबर होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी अर्जुनचे खूप कौतुकदेखील केले होते.