Nikki Tamboli And Arbaaj Patel : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे यंदाचं पर्व विशेष चर्चेत राहिलं. यंदाच्या या पर्वात अनेक नाती जुळली आणि ही नाती चर्चेतही राहिलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात भावा बहिणींचे नाते तर काहींमध्ये प्रेमाचे बंधही फुलताना पाहायला मिळाले. यंदाच्या या पर्वात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व निक्की तांबोळीने तुफान गाजवलं. यानंतर हळुहळू तिचे घरातील डायलॉग सोशल मीडियावर लोकप्रिय होऊ लागले. “बाईSSS हा काय प्रकार” या डायलॉगने तर गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.
‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या सीझनमध्ये सर्वांत गाजलेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच्या जवळीकची मोठी चर्चा झाली. घराबाहेर आल्यानंतरही निक्की व अरबाज एकत्र फिरताना दिसले. तसेच एकमेकांना ते वेळ देताना दिसले. अरबाजच्या भूतकाळामुळे अनेकांनी दोघांच्या या नात्यावर प्रश्न उपस्थित केले. अरबाज बिग बॉसमधून बाहेर आला आणि त्याने निक्कीसाठी आधीचे नाते संपवल्याचेही म्हटलं. त्याने निक्कीची समजूतही काढली, आणि आता ते दोघे एकत्र असल्याचं समोर आलं.
आणखी वाचा – अतुल कुलकर्णींच्या गाजलेल्या ‘बंदिश बँडिट्स’ सीरिजचा नवीन सीझन चाहत्यांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार?
‘बिग बॉस’नंतर ही जोडी एकत्र फिरायला गेली असल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी पापाराझींनी एअरपोर्टवर निक्की-अरबाजला एकत्र स्पॉट केलं. यावेळी दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोझही दिल्या. त्यानंतर काही वेळातच निक्कीने चंदीगढ लोकेशन मार्क करत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. आणि त्याच्या पुढच्या स्टोरीमध्ये दोघंही गाडीतून एकत्र प्रवास करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर मनाली हिमाचल प्रदेश असं लोकेशन शेअर करतही त्यांनी स्टोरी शेअर केली. यावरुन निक्की व अरबाज हे हिमाचल प्रदेश येथे फिरायला गेले असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – ‘छावा’नंतर विकी कौशलचं आणखी एक मोठं पाऊल, ‘महावतार’मध्ये भगवान परशुरामाची भूमिका साकारणार, लूक समोर
दोघांनी ‘बिग बॉस’च्या घरात एकमेकांना शब्द दिल्याप्रमाणे हा शो संपल्यानंतरही एकत्र राहायचं नातं निभावत आहेत. या दोघांनी त्यांचं रिलेशनशिप उघडपणे मान्य केलं नसलं तरीही “माझ्या आयुष्यात अरबाज खूप खास आहे, आमच्यात खूप चांगला बॉण्ड आहे” असं निक्कीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.