Neha Kakkar Video : बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहली नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. काल १२ नोव्हेंबर रोजी कुटुंबियांच्या उपस्थितीत तो विवाहबद्ध झाला. या अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हिमांश कोहलीने दिल्लीतील एका मंदिरात विनीशी लग्न केले. हा विवाह एका खाजगी समारंभात झाला आहे. या लग्नसोहळ्याला कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. दरम्यान, त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि लोकप्रिय गायिका नेहा कक्करचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसली होती.
हिमांश कोहलीच्या लग्नाच्या दिवशी नेहा कक्करने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सोफ्यावर बसलेली दिसत आहे. यावेळी गायिकेने ग्लॅमरस काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. नेहा या व्हिडीओमध्ये ‘मेरा ये दिल तेरी और बढने लगा’ गाणे गुणगुणताना दिसत आहे. गायकाचा हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओला नेटकरी हिमांशच्या लग्नाशी जोडत आहेत.
व्हिडीओशिवाय नेहाने या पोस्टवर स्वतःचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या नारळाच्या पेयाचा आस्वाद घेताना दिसली होती, या फोटोमध्ये गायिका एका इमारतीच्या टेरेसवर असलेल्या कॅफेमध्ये दिसत आहे. नेहाची यावेळची गोंडस स्माईल चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत आहे. नेहा कक्कर बॉलिवूडची लोकप्रिय गायिका आहे. जिचे प्रत्येक गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. गाण्याबरोबरच अभिनेत्रीच्या डान्स मूव्ह्सचेही चाहते वेडे झाले आहेत.
नेहा कक्कर अनेक दिवसांपासून अभिनेता हिमांश कोहलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर २०१८ मध्ये दोघांचे अचानक ब्रेकअप झाले. याचा नेहाला चांगलाच धक्का बसला. ब्रेकअपनंतर ती एकदा नॅशनल टीव्हीवर अश्रू ढाळताना दिसली होती. मात्र, हिमांशपासून वेगळे झाल्यानंतर नेहाच्या आयुष्यात गायक रोहनप्रीतची एन्ट्री झाली. दोघांनी एकत्र एक म्युझिक व्हिडीओदेखील केला आहे. यादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले.