क्रिती सेनॉन ही बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. आजवर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तिच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्डदेखील मोडले आहेत. ‘हिरो’, ‘गणपत’, ‘मिमी’ असे अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. मात्र आता तिच्याबद्दल काही अपडेट समोर आले आहेत ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चादेखील सुरु झाली आहे. (kriti sanon smoking video)
आपल्या अभिनयाने क्रितीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ती सिगरेट ओढताना दिसत आहे. यामुळे आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. नुकताच क्रितीचा ३४ वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसासाठी ती ग्रीसमध्ये गेल्याच्याही चर्चा सुरु झाल्या. तिच्याबरोबर बहीण व तिचा कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया असल्याचेही बोलले गेले. याचवेळीस तिचा एक बीचवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्मोकिंग करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
रेडिट युजरने क्रितीचा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की. “ग्रीसमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये क्रितीच्या हातात सिगरेट असलेली दिसत आहे. त्यांची प्रतिमा सगळ्यांपेक्षा चांगली आहे. तरीही ती सिगरेट कशी ओढत आहे? ही सवय शरीरास हानीकारक व चुकीची आहे. मला क्रिती खूप आवडते. ज्या व्यक्तीने ही स्टोरी पोस्ट केली आहे त्या व्यक्तीकडे नूपुर व तिच्या बॉयफ्रेंडचेही फोटो आहेत.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक युजर्सने त्यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “अरे त्यांच्या खासगी आयुष्याची काळजी घ्या. ती देखील माणसं आहेत. त्यांना जगू द्या. आता प्रायव्हसी ते चंद्रावर जाणार का?”, अजून एका युजरने लिहिले की, “सुट्ट्यांसाठी सेलिब्रिटी बाहेर गेले असतील तर त्यांच्या मर्जीशिवाय त्यांचे व्हिडीओ व फोटो काढणे चुकीचं आहे. पण क्रिती जास्त वाईट आहे. तिचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत”. क्रितीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.