बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्याच्या मुलांचा सांभाळ करायला महिला असतात. बरेचदा त्या त्यांच्याबरोबर स्पॉटही होताना दिसतात. अनंत अंबानीचा लहानपणी सांभाळ करणारी महिला ललिता डिसिल्वा ही बॉलीवूड इंडस्ट्रीत अनेक कलाकारांच्या मुलांचा सांभाळ करताना दिसली. करीना कपूरची दोन्ही मुलं तैमूर व जेह यांचा सांभाळ करणारी महिला म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. सध्या, ललिता राम चरण व त्यांची पत्नी उपासना यांची मुलगी क्लिन कारा कोनिडेलाचा ती सांभाळ करत आहे. एका मुलाखतीत ललिताने तैमूर-जेहची सांभाळ करणारी महिला यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Lalita D’Silva statement)
हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत, ललिता डिसिल्वाने तैमूरची नैनी असं संबोधल्याबद्दल तिने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ती काळजीवाहक नसल्याचे स्पष्ट केले. तिने याबाबत बोलताना भाष्य केले की, “ती एक बालरोग परिचारिका आहे आणि तिला हे काम करायला आवडते. ललिता म्हणाली, “आधी टाटा, बिर्ला, प्रत्येकाकडे बालरोग परिचारिका होती आणि सांभाळ करणाऱ्या महिला होत्या. मी सांभाळ करणारी महिला नाही तर मी बालरोग परिचारिका आहे आणि मला तेच म्हणायला आवडते”.
ललिताने कोनिडेला कुटुंबासह घालवलेल्या वेळेचीही आठवण करुन दिली. मुंबई व हैद्राबादच्या संस्कृतींमध्ये असलेल्या प्रचंड फरकाबद्दल बोलताना त्यांनी नमूद केले की, त्यांच्या दक्षिण भारतीय मुळांमुळे त्यांच्या खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत. उपासनाचे कौतुक करत ललिता म्हणाली, “उपासना माझ्या खांद्यावर हात ठेवून विचारायची, ‘चहा घेतलास का?’ संपूर्ण कुटुंब अगदी सामान्य आहे. ते तुम्हाला त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास आणि त्यांच्या मुलाची काळजी घेण्यास भाग पाडत नाहीत. बाहेरगावहून तुम्ही आला आहात तर आम्हाला तुमचे कुटुंब समजा असंही ते म्हणायचे आणि आता ते माझे कुटुंब आहेत”.
ललिताने हैदराबादमधील पापाराझी संस्कृतीबद्दलही सांगितले आणि त्याची तुलना मुंबईच्या पापाराझीशी केली. ते म्हणाले, “मुंबईसारखी विक्षिप्त गर्दी मी तिथे पाहिली नाही, तिथेही माध्यमे आम्हाला त्रास देतात पण लोकच ते सांभाळतात”.