शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कतरिना कैफच्या हाताला मोठा काळा पॅच, डायबिटीज असल्याचे तर्कवितर्क, चाहत्यांनी तब्येतीची विचारपूस केली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 5, 2024 | 12:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
katrina kaif viral video

कतरिना कैफच्या चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

सध्या देशात सर्वत्र नवरात्रीची धूम आहे. मनोरंजन क्षेत्रातील सर्व कलाकारदेखील दुर्गा देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेले दिसून येत आहेत. नुकताच एका दागिन्याच्या ब्रॅंडने नवरात्रीचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार दिसून आले. यामध्ये मलायका आरोरा, कृती सेनन, श्रद्धा कपूर असे कलाकार उपस्थित होते. हे सर्व कलाकार मुंबईमधील कलीना एअरपोर्टवर दिसून आले. यावेळी तिथे कतरिना कैफचीदेखील उपस्थिती पाहायला मिळाली. तिने मरुन रंगाची बांधणीची साडी नेसली होती. तिच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. सर्व कार्यक्रमात तिच्यावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. तसेच तिच्या सौंदर्याचेही खूप कौतुकदेखील केले गेले. मात्र या सगळ्यात प्रेक्षकांची नजर तिच्या हाताकडे गेली. (katrina kaif viral video)

कतरिना बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर ती अनेक कार्यक्रमांना हजर असलेली  दिसून येते. तिने भारतीय संस्कृती पूर्णपणे आत्मसात केलेली दिसून आली आहे. अशातच आता तिने नवरात्रीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने जेव्हा प्रवेश केला तेव्हा चाहत्यांना अभिवादन केले आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेऊ लागली. यावेळी तिच्या हाताकडे सगळ्यांच्या नजरा गेल्या आणि त्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली.

आणखी वाचा –  गुहेसारख्या खोल्या, घराला किल्ल्यासारखा टच, १०७ कॅमेरे अन्…; Bigg Boss 18 च्या घराची पहिली झलक, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

चाहत्यांबरोबर सेल्फी घेत असताना कतरिनाच्या उजव्या हाताच्या दंडावर एक काळ्या रंगाचा पॅच दिसून आला. यामुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तिचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “’कतरिना ठीक तर आहे ना?”, तसेच एकाने लिहिले की, “हा मेडिकल पॅच आहे”. अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “कतरिनाला मधुमेह तर नाही झाला ना?”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “हाच प्लेबॉय…”, निक्की अरबाजमधील जवळीक पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “प्रेमाचं नाटक करत…”

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, हा एक डायबेटीस पॅच असून ग्लुकोज तपासण्यासाठी केला जातो. हे लावल्यामुळे सारखंसारखं बोटाला सुई टोचण्याची गरज नसते. तसेच याचा वापर फिटनेस ट्रॅक करण्यासाठीदेखील वापरला जातो. पण आता कतरिना ठीक असेल अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.  

Tags: black pathkatrina kaifright arm
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Abhijeet Sawant Sunil Grover, Chunky Pandey, Rahul Vaidya, Akash Aziz, Salim Merchant, Farah Khan support

Bigg Boss Marathi चा विजेता अभिजीत सावंतच असणार?, बॉलिवूडकरांचा मोठा पाठिंबा, म्हणाले, "तोच जिंकावा आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.