Bigg Boss 18 House Photo : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा १८वा सीझन नव्या थीमसह प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ‘बिग बॉस’ची थीम नेमकी काय असणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. यावेळी कार्यक्रमाची थीम टाइमचा तांडव अशी आहे. या थीममध्ये स्पर्धकांना वेळ, प्रवास किंवा भूतकाळ याबद्दल चर्चा करु शकतात. कारण मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्याची आठवण करुन देत ‘बिग बॉस’च्या घराचेही गुहेत रूपांतर झाले आहे. ही एक सामान्य गुहा नाही, तर एक भव्य गुहेसारखे हॉटेल आहे. कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि प्रॉडक्शन डिझायनर वनिता कुमार यांच्या जोडीने हे घर डिझाइन केले आहे. याबद्दल बोलताना ओमंग म्हणाले, “दरवर्षी एका थीमवर काम करायचं असतं. गेल्या वर्षी आम्ही युरोपियन शैलीत घर बांधले होते, पण यावेळी आम्हाला भारतीय घर बांधायचे होते. प्रत्येक मालिकेत आणि प्रत्येक चित्रपटात आपल्याला भारतीय घरे दिसतात, मग आपण वेगळे काय करायचे, हे आव्हान होते, तेव्हा विनीता म्हणाली की, शोची थीम टाईम ट्रॅव्हल आहे, त्यामुळे आपण भूतकाळात, गुहेच्या युगात जाऊ शकतो”.
‘तसं पाहिलं तर अजिंठा-एलोरा असो की एलिफंटा, चित्रकला व कला या लेण्यांमधून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या घराला भव्यता त्यांनी केव्ह हॉटेल म्हणजेच गुहेसारखे हॉटेल तयार केले. सर्व लिव्हिंग रूममध्ये एक मोठा चेहरा पाहायला मिळत आहे. हा एका राजपुत्राचा चेहरा आहे. तर बाहेर तलावाजवळ एका महिलेचा चेहरा ठेवण्यात आला आहे. याशिवाय दरवेळेप्रमाणे घोडे, प्राणी, फुलपाखरे आदीही गोष्टी पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, बागेत बाथरूमच्या प्रवेशद्वारावर एक मोठा लाकडी ट्रोजन हॉर्स आहे, जिथे खूप गप्पागोष्टी करताना स्पर्धक दिसतील. यावेळी, बिग बॉस टास्क व्यतिरिक्त, स्पर्धकांना घरातील खडबडीत रस्त्यावरुन जावे लागेल, कारण यावेळी घरात सर्वत्र खांब आहेत. फरशीही फ्लॅटऐवजी अनड्युलेटिंग करण्यात आली आहे. बागेचे क्षेत्र तीन भागात विभागलेले आहे.
आणखी वाचा – “ज्या परिस्थितून तो आला आणि…”, सूरजच्या गावी जाणार वर्षा उसगांवकर, म्हणाल्या, “प्रसिद्धी मिळाली त्यानंतर…”
घराची दिवाणखाना अतिशय भव्य व मोठी आहे. किचन, डायनिंग रुम आणि ड्रॉईंग रुमबरोबरच यावेळी जेलचीही निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्यांदाच घराच्या मधोमध असा कारागृह बांधण्यात आला आहे. तर कन्फेशन रुमच्या बैठकीला दिवाणाचे स्वरुप देण्यात आले आहे. येथे एक मोठे घड्याळ आहे, तर जमिनीवर सोन्याची नाणी जडलेली आहेत. तर घरात भविष्यकालीन शैलीतील कार उभी आहे, जी काळाच्या प्रवासाचे प्रतीक आहे.
त्याचप्रमाणे बेडरुमचे फ्लोअरिंग जिन्यासारखे आहे, त्यामुळे दररोज चढताना आणि खाली जाताना स्पर्धकांना चिडचिड होण्याची शक्यता आहे. येथे, बेड देखील वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बेडरुमच्या भिंती सुंदर मत्स्यालय, तलाव इत्यादींनी आकर्षक बनवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर यावेळी पायऱ्या व खांब असल्याने अधिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावर्षी स्पर्धक १०७ कॅमेऱ्यांच्या रडारखाली असतील.