Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा शेवट अगदी जवळ आहे. १०० दिवसांचा प्रवास ७० दिवसांवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. हे पर्व संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना घरात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. यंदाच्या पर्वात स्पर्धकांची अनेक नाती उघडकीस आली. दरम्यान, निक्की व अरबाज यांच्या मैत्रीच्या नात्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’ सुरु झाल्यापासून पहिल्याच आठड्यात अरबाज-निक्कीच्या प्रेमाचे वारे घरात वाहू लागले होते. त्यांनतर मध्यंतरीच्या काळात दोघांमध्ये वाद झालेले दिसले मात्र हे वाट मिटल्यानंतर दोघे पुन्हा एकत्र आले.
आठव्या आठवड्यात अरबाजने घरातून एक्झिट घेतली. यामुळे निक्की प्रचंड भावुक झाली होती. निक्कीच्या अश्रूंचा बांध त्यावेळी फुटला. अरबाज घराबाहेर गेल्यावर फॅमिली वीकमध्ये घरात निक्कीचे आई-बाबा तिला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी निक्कीच्या आईने एक धक्कादायक बातमी सांगत तिला सावध केले. निक्कीच्या आईने अरबाजचा साखरपुडा झाला असल्याचं कानावर आलं असल्याचं खुलेपणाने सांगितलं. हे ऐकताच निक्कीचा पारा चढला. त्यावेळी आता अरबाज समोर आला तर माझा राग अनावर होईल, अशी भीतीही तिने स्पर्धकांसमोर बोलून दाखविली.
आणखी वाचा – “ज्या परिस्थितून तो आला आणि…”, सूरजच्या गावी जाणार वर्षा उसगांवकर, म्हणाल्या, “प्रसिद्धी मिळाली त्यानंतर…”
अखेर ग्रँड फिनालेला एक दिवस शिल्लक असताना म्हणजेच शेवटच्या दिवशी अरबाजने घरात पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे. संपूर्ण सीझनमध्ये सहभागी झालेले सगळे सदस्य रिएन्ट्री घेतानाचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, अरबाज धावत येत निक्कीला मिठी मारतो आणि तिला उचलून बेडरुम एरियामध्ये घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतर दोघे हातात हात धरत एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. निक्की अरबाजला थेट सवाल करत “तू जाताना रडला नाही, मला वाटलं खरंच तुझं बाहेर लफडं असेल म्हणून तुला फरक नाही पडला”, असं म्हणताना दिसली.
आता अरबाजला निक्की माफ करणार का?, याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या असताना नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर ट्रोल करत त्यांच्या गळाभेटीवरुन आक्षेप घेतला आहे. “लहान मुलं कार्यक्रम बघतात हे ‘बिग बॉस’ला आता दिसत नाही का”, “काय तो ड्रामा, काय ते नाटक”, “अरबाज फसवा आहे. स्वतःच पाच वर्षांचं नातं तोडून इथे प्रेमाचं नाटकं करतोय. लोकांनी बरोबर तुझी जागा दाखवली”, “सूरज जो निक्कीला बोलला ते खर झालं, निक्की अरबाज यांची गळाभेट दिसली”, “हा अरबाज एक नंबरचा प्लेबॉय आहे. प्रत्येक शोमध्ये याला प्रेम होतं”, “जे काय करायचं बाहेर जाऊन करा लहान मुलं शो बघतात”, अशा अनेक कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे.