बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हे नेहमी चर्चेत असते. आजूबाजूला घडत असलेल्या अनेक प्रकरणांवर ती भाष्य करताना दिसते. सध्या ती अभिनयाबरोबरच राजकारणामध्येदेखील अधिक सक्रिय आहे. मात्र नुकताच तिचा एक नवीन चित्रपट भेटीला येणार आहे. ‘इमर्जन्सी’ हा तिचा नवीन चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये तिने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच सध्या ती ठीक-ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. (kangana ranuat on aamir khan)
या सगळ्यातच तिची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये घटस्फोटीत लोक वेगळे झाल्यानंतरही एकमेकांवर प्रेम करताना दिसतात. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तिने बॉलिवूड अभिनेता आमीर खानवर निशाणा साधला आहे. आमीरने दोन वेळा लग्न केले आणि दोघीपासून त्याने घटस्फोटही घेतला. दरम्यान यावरुनच कंगनाने भाष्य केले आहे.
कंगनाने ‘मॅशबेल इंडिया’ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं की, “तू अजूनही तुझ्या एक्सबरोबर संपर्कात आहेस का?”, त्यावर कंगनाने उत्तर दिले की, “मी कधीही माझ्या एक्सच्या संपर्कात राहिले नाही. मी तशा लोकांपैकी नाही जे घटस्फोट होऊनदेखील एक्सला लाडाने हाक मारतात. जर असं करायचं असेल तर वेगळे का झाले? एकत्रच राहिले असते”. कंगनाचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच नाव न घेता तिने आमीरची खिल्लीदेखील उडवली आहे.
आमीरने दोन लग्न केली असून तो पहिल्यांदा रिना दत्ताबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यांना इरा व जुनैद अशी दोन मुलं देखील आहेत. मात्र काही कारणांमुळे ते २००२ साली एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर २००५ साली तो किरण रावबरोबर लग्नबंधनात अडकला. मात्र २०२१ साली त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही आमीरचे दोन्ही पत्नीबरोबर खूप चांगले संबंध आहेत. तसेच कंगनाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रेलर समोर येताच शीख समुदायाने नाराजी व्यक्त करत चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.