दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य त्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरु करणार असल्याचं समोर आलं आहे. सामंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. नागा चैतन्य शोभिता धुलिपालासह पुढील आयुष्य काढणार असल्याचं समोर आलं आहे. नुकतेच त्यांनी लग्न केले असून आता लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. लग्नाची तारीख व ठिकाण याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु मार्च २०२५ मध्ये दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग होणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. आता नागाने यावर मौन तोडत लग्नाबाबत काही खुलासे केले आहेत. (Naga Chaitanya On Wedding)
नागा चैतन्य व शोभिता धुलिपाला बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे एकत्र अनेक फोटो व्हायरल झाले होते, पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच भाष्य केलं नाही. ८ ऑगस्ट रोजी त्यांनी लग्न केले आणि त्यांच्या नात्याची घोषणा केली. नुकताच नागा चैतन्य नवऱ्या मुलाच्या वेशात दिसला. चाहत्यांना वाटले की त्याने अचानक शोभिताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तो एका कपड्याच्या ब्रँडच्या लॉन्च कार्यक्रमासाठी जात होता. यावेळी, जेव्हा मीडियाने त्याला त्याच्या वास्तविक लग्नाची माहिती विचारली तेव्हा तो म्हणाला, “कदाचित तुम्हाला असे वाटेल की हे माझ्या लग्नासाठी काउंटडाउन आहे”.
नागा चैतन्यने असेही उघड केले की त्याला शोभिताबरोबर शाही विवाहसोहळा करायचा नाही. तिचा असा विश्वास आहे की, “लग्न हे त्या लोकांसाठी आहे ज्यांच्यासाठी ते खूप महत्वाचे आहे. लग्न म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या लोकांबद्दलचा आदर आहे. हे काही फार मोठे लग्न नाही, परंतु लोकांनी संस्कृती व परंपरा लक्षात ठेवल्या पाहिजेत, म्हणून मला लग्न साधेपणानेच हवे आहे”.
नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी त्यांचा मुलगा व भावी सून शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्हाला आमचा मुलगा नागा चैतन्यची शोभिता धुलिपालाबरोबरच्या साखरपुड्याची बातमी जाहीर करताना खूप आनंद होत आहे. आज सकाळी ९.४२ वाजता हा समारंभ पार पडला. आमच्या कुटुंबात तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. अशा या आनंदी जोडप्याचे अभिनंदन”, असं म्हटलं.