Irina Rudakova On Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील स्पर्धकांची अंतिम सोहळ्यात जाण्यासाठीची धावपळ पहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धक स्वतःला सिद्ध करताना दिसत आहे. तर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख स्पर्धकांची चांगलीच शाळा घेताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेत आर्या जाधव, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, अभिजीत सावंत हे चार स्पर्धक होते. या चार स्पर्धकांवर टांगती तलवार असताना इरिना रुडाकोवाचा प्रवास संपला. इरिनाला ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घ्यावी लागली.
इरिनाने अगदी पाहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. मराठी कळत असलं तरी नीट मराठी बोलता येत नव्हतं असं असलं तरी ती तिचा खेळ एकटी खेळत होती. फॉरेनर म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यानंतर इरिनाने तिच्या प्रेमळ मराठी संवादाने प्रेक्षकांची मन जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक स्पर्धकासह ती मराठी भाषा नव्याने शिकताना दिसली. अंकिताने तिला मालवणी तर डीपीने तिला कोल्हापुरी भाषा शिकवली. एकूणच हा प्रवास सुरु असताना इरिना वैभव चव्हाणच्या प्रेमात पडली. इरिना व वैभवची प्यारवाली लव्हस्टोरी ‘बिग बॉस’च्या घरात पाहणं रंजक ठरलं.
आणखी वाचा – मराठी दिग्दर्शिकेच्या घरी झालेली चोरी, आरोपीला अटक झाल्यानंतर मोठा खुलासा, ड्रग्जसाठी पैसे खर्च केले अन्…
इरिनाला ‘बिग बॉस’च्या घरात कोण खरं वाटत असा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देत ती म्हणाली की, “हा खरंच खूप कठीण प्रश्न आहे. पण माझ्या डोळ्यांनी कोण खरं कोण नाही हे पाहिलं आहे. आणि आता मला या घरात सूरज खरा वाटतोय”. सूरजबरोबरचा बॉण्ड कसा आहे हा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, “सूरजच्या गावी खूप प्राणी आहेत. तो फायनालिस्ट आहे. ‘बिग बॉस’मधून निघाल्यावर मी त्याच्या गावी जाणार आहे आणि त्याच्याकडुन क्युट असा ससा घेऊन येणार आहे. मला अशी अपेक्षा आहे की सूरज फायनालिस्ट असेल. त्याला आठ बहिणी आहेत. त्याच खूप मोठा परिवार आहे”.
पुढे इरिना म्हणाली, “मला असं वाटतंय की सूरजने हा खेळ जिंकावा. सूरज खूप चांगला माणूस आहे. पण तो खूप रागीट आहे. एका टास्कदरम्यान मी त्याचा अनुभव घेतला. मी त्याला थांबवत होते, त्याला शांत राहायला सांगत होते तेव्हा मी त्याचा राग पाहिला. बुक्कीत टेंगुळ देऊन त्याने काही चूक केली नाही पाहिजे याचीही मला भीती वाटते. आणि कोणतीच चूक त्याच्याकडून नाही झाली पाहिजे यासाठी मी प्रार्थना केली”.