Bigg Boss 17 Updates : ‘बिग बॉस १७’ हा बहूचर्चित शो आता अंतिम टप्प्यात आला असून अंतिम भागाच्या दिशेने या शोचा प्रवास सुरु आहे. अशातच या शोमध्ये विविध टास्कमुळे हा शो आणखीनच उत्कंठावर्ध्याक बनत चालला आहे आणि घरातील प्रत्येक टास्कमध्ये जिंकण्यासाठी सप्रधाक जीवाची बाजी करत आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये टॉर्चर टास्क पार पडला. टॉर्चर टास्कने सर्व घरातील सदस्यांना हादरवून सोडले आहे. या टास्कदरम्यान अंकिता लोखंडे आणि मुन्नवर फारुकी यांच्यातील नातेही स्पष्ट झाले आहे.
‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला अंकिता लोखंडे व मुन्नवर फारुकी यांच्यात खूप छान बॉन्ड पाहायला मिळाला. पण या टॉर्चर टास्कनंतर त्यांचं नातं पूर्णपणे तुटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. या टास्कदरम्यान अंकिता लोखंडे व विकी जैन यांनी मुन्नवरवर निशाणा साधला. आणि ज्यावर अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने तिचे प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच झालेल्या भागामध्ये विक्की जैनच्या टीमने टॉर्चर टास्कमध्ये वापरलेल्या सर्व वस्तू मुन्नवरच्या टीमपासून लपवून ठेवल्याचं दिसलं होतं. याच कारणावरून मुनव्वरने अंकिता व विकी यांच्या रेशनमधून काही वस्तू काढल्या आणि त्यानंतर घरात मोठे नाट्य घडले. यादरम्यान अंकिता, विकी, मन्नारा व मुन्नवर यांच्यात बरीच बाचाबाची झाली. यावर देवोलिना भट्टाचार्जीने आपले मत मांडले आहे.
Team Vicky bhaiyya ki toh pehle se hi pasine choot rahe hai tabhi toh saara samaan pehle se chupa diya ???????????? Yeh toh woh baat hogayee ulta chor kotwal ko daante. And in all these ankita is so wrong. #bb17 @BiggBoss
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) January 17, 2024
आणखी वाचा – परदेशात लेकीला पूजा करायला शिकवत आहे प्रियांका चोप्रा, अभिनेत्रीच्या संस्कारांचं कौतुक अन् फोटो व्हायरल
देवोलिनाने ट्विट करत असे म्हटले आहे की, “टीम विकीला तर आधीपासूनच भीती वाटत आहे. म्हणून त्याने सुरुवातीलाच सर्व सामान लपवून ठेवले आहे. म्हणजे हे असं झालं की, चोर उलट पोलिसालाच ओरडत आहे आणि या सर्व टास्कमध्ये अंकिता ही पूर्णत: चुकीची होती.”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या टास्कमध्ये विकीने मुन्नवरची कॉलर धरत त्याच्यावर निशाणा साधल्याचेदेखील पाहायला मिळाले. त्यामुळे आता ‘वीकेण्ड का वार’मध्ये सलमान खान घरातील स्पर्धकांवर काय प्रतिक्रिया देणार हे पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.