बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण सध्या खूप चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या आहेत. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळत असते.मात्र सध्या ती तिच्या गरोदरपणामुळे अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळते.फेब्रुवारी महिन्यात दीपिका व रणवीर यांनी सप्टेंबरमध्ये घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याचे चाहत्यांना सांगितले होते. त्यानंतर दीपिकाला अनेक ठिकाणी बेबी बम्प फ्लॉट करतानादेखील पाहायला मिळाले. अशातच आता सप्टेंबरमध्ये कोणत्या दिवशी ती बाळाला जन्म देणार? याबद्दलची माहिती समोर आली आहे. (deepika paudkone delivery date)
दीपिकाने प्रेग्नन्सी अनाऊन्स केल्यापासून तिचे चाहते बाळ जन्माला येण्याची वाट बघत आहेत. मात्र आता तिची डिलीव्हरी डेट समोर आली असून रणबीर कपूरचा याच्याशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर रणवीर व दीपिका आई-वडील होणार आहेत. मात्र सोशल मीडियावर दीपिका सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म देणार असल्याचेदेखील बोलले गेले. यावर दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मीडिया रिपोरर्ट्सनुसार, दीपिकाची डिलीव्हरी डेट २८ सप्टेंबर सांगितली जात आहे. साऊथ मुंबईमधील एका रुग्णालायात ती बाळाला जन्म देणार आहे. मात्र या दिवशी अजून एका अभिनेत्याचा जन्म झाला होता. हा अभिनेता म्हणजे रणबिर आहे. त्याचा वाढदिवसदेखील २८ सप्टेंबर रोजी असतो. त्यामुळे हा एक मोठा योगायोग असल्याचेदेखील बोलले जात आहे.
काही वर्षांपूर्वी रणबीर व दीपिका एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांचा काही वर्षांतच ब्रेकअप झाला. अभिनेत्रीने त्याच्या नावाचा टॅटूदेखील काढला होता. मात्र त्यांचं नातं टिकू शकले नाही. तसेच मीडिया रिपोर्टसनुसार, बाळाला जन्म दिल्यानंतर दीपिका संपूर्ण लक्ष बाळाकडे देणार आहे. मार्च २०२५ पासून ती पुन्हा काम करण्यास सुरुवात करेल. पण याबद्दल दीपिकाने कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नाही. या बातमीनंतर दीपिकाच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच चिमूकल्याच्या आगमनासाठी आता दोघंही सज्ज आहेत. मुंबईतील एका नवीन आलिशान घरांमध्ये शिफ्ट होणार असून घराचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.