Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन प्रचंड चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीपासूनच दोन गट तयार झाले. या दोन्ही गटातील स्पर्धकांचे वादविवाद, मैत्री, राडा पाहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्यात बीबी करन्सी आणि कॅप्टन्सीसाठी टास्क पार पडला. यावेळी घनःश्याम सोन्याची नाणी गोळा करायला पाताळ लोकात शिरला असून त्याचा तोल जातो आणि तो गुहेत पडतो. वर्षाताईंकडे असलेल्या सोन्यांच्या नाण्याचा बॉक्स तो उडवून लावतो. वर्षाताई तो बॉक्स उचलायला जातात तर घनःश्याम त्यांना अडवतो. पुढे अंकिता घनःश्यामला एक टपली देते आणि तो खाली पडतो. सगळे सदस्य हसायला लागतात. अंकिता घनःश्यामचा पाय धरून त्याला ओढते. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
यामुळे अंकिताची जोडी जिंकते. तसंच घरातील सदस्य अंकिताचे कौतुक करतात. मात्र शनिवारच्या भाऊचा धक्कामध्ये अंकिताच्या या कृतीबद्दल तिला रितेश देशमुखमे झापलं आहे. अंकिताने घन:श्यामबरोबर केलेली वागणूक चूकीची असतल्याचे म्हणत रितेशने अंकिताला चांगलंच झापलं. यावेळी रितेश अंकिताला असं म्हणाला की, “मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे, तुम्हाला घन:श्यामबद्दल आधीपासूनचं राग आहे. तुम्ही त्यांना कानाखाली मारावसं वाटतंय असंही म्हणाला होतात. पण तेव्हा मी हकल्यात घेतलं होतं. पण तुम्ही त्यांना पाडलं आणि जमिनीवर पडून खेचलंदेखील. तसंच त्यांच्यावर अरेरावीही केली. हा कोणता राग आहे.”
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील सर्व सदस्यांना बसणार शॉक, पण नेमकं झालं तरी काय? पहा हा खास प्रोमो
यापुढे रितेश असं म्हणाला की, “तुमच्या रागामुळे ‘बिग बॉस’ने हा टास्क रद्द केला. तरीही तुमचे मित्र तुम्हाला काही बोलले नाहीत. ते उलट घन:श्यामलाच बोलत होते. या दूटप्पीपणा नाही का? आणि तुम्ही जे घन:श्यामबरोबर केलं तेच जर एका पुरुषाने तुमच्याबरोबर केलं तर तुम्हाला कसं वाटेल. अंकिता तुम्ही जे केलं ते फार चुकीचं होतं. इतकं होऊनही घरातील एकही सदस्य तिला काहीच बोलला नाही. कारण तुमचा एक ग्रुप आहे”.
दरम्यान, अंकिताचा गेम दिसून यावा म्हणून धनंजयने घन:श्यामला तसं करण्यास सांगितलं असल्याचे देखीक रितेशने यावेळी सर्वांसमोर आणले आणि यावरून त्याने धनंजयलादेखील सुनावले. “दुसऱ्याचा खेळ दिसून यावा म्हणून तुम्ही वाईट होऊ नका कारण ‘बिग बॉस हा ग्रुपचा खेळ नसून स्वत:चा वैयक्तिक खेळ आहे” असं रितेशने सर्वांना सांगितलं. तसंच वैभवच्या मागच्या खेळाची तुलना करत रितेशने धनंजयलादेखील गद्दारची उपमा दिली.