बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या खूप चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिने व रणवीर यांनी आई-वडील होणार असल्याची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती. त्यानंतर दोघेही राधिका मर्चट व अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये धमाल करताना दिसले होते. सप्टेंबर महिन्यामध्ये दीपिका बाळाला जन्म देणार असून तिचा सध्या चौथा महिना सुरु आहे. तिने अद्याप बेबी बंपचा कोणताही फोटो शेअर केला नसला तरीही नुकताच तिने आपल्या पाठीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. (deepika padukone instagram post)
दीपिकाने बऱ्याच कालावधीनंतर सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिची पाठ उन्हामुळे काळी पडल्याची दिसून येत आहे. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. पण तिच्या पाठीपेक्षा पण तिच्या मानेकडे चाहत्यांचे अधिक लक्ष वेधले आहे. दीपिकाने जो फोटो शेअर केला आहे तो समुद्रावरील आहे.यामध्ये तिने एक टॉप घातला आहे ज्यामध्ये तिच्या पाठीवर असलेल्या टॅनच्या लाइन दिसून येत आहेत. हा फोटो मागून काढला असल्याने व केसदेखील वर बांधल्याने तिची मान व पाठ दोन्ही दिसत आहेत.
काही वर्षांपूर्वी दीपिका रणबीर कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तेव्हा मानेवर RK असा टॅटू काढला होता. तो टॅटू आता दिसत नव्हता. त्यावरून चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी टॅनिंगवरुन तिला विचारले तर काही नेटकऱ्यांनी टॅटू असण्यावरुन आणि नसण्यावरुनदेखील प्रश्न केले आहे.
यावर नेटकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “टॅनपासून वाचण्यासाठी दीपिका सनस्क्रीनचा वापर करायला विसरली का?, दुसऱ्या नेटकऱ्याणे लिहिले आहे की, “८२e ची सनस्क्रीन नाही लावली?”, तिसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “मी टॅटू शोधला पण मला दिसला नाही”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की “आता आम्हाला बेबी बंप बघायचे आहे”.
सध्या दीपिका गरोदरपणाचा काळ एंजॉय करताना दिसत आहे. तिचे चाहते देखील बाळाची आतुरतेने वाट बघत आहेत.