बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सैफ अली खान. ‘दिल लगी’ व ‘मैं खिलाडी तू अनाडी’ यांसारख्या चित्रपटातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. यानंतर त्याने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आपल्या अभिनयाने चर्चेत असणारा हा अभिनेता अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अशातच सैफने एकदा रस्त्यात एका माणसाशी वाद घातला होता आणि या वादातून त्याने त्या व्यक्तीचा चावादेखील घेतला होता. सैफचा जवळचे मित्र, अभिनेता व चित्रपट निर्माते कमल सदाना यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे.
सिद्धार्थ कन्नन यांच्या मुलाखतीदरम्यान, कमल सदाना यांनी १९९० च्या दशकात घडलेली ही घटना सांगितली आहे. जेव्हा सैफ अली खान व अमृता सिंग एकत्र होते. यावेळी कमल असं म्हणाले की, “एकदा आम्ही (तो, सैफ व अमृता सिंग) कुठूनतरी घरी परतत होतो आणि सैफ गाडी चालवत होता. तेव्हा पाठीमागून एक कार आली आणि आम्हाला ओव्हरटेक करुन पुढे गेली. तेव्हा सैफने त्याला हाताने काही संकेत दिले असावेत.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “हे दोघे रस्त्याच्या मधोमध त्यांच्या कारमधून बाहेर पडले आणि त्यांच्यात हाणामारी झाली आणि ही हाणामारी इतकी गंभीर झाली की त्यांनी एकमेकांचा चावा घेतला. मात्र, नंतर दोघेही एकमेकांकडे बघून हसायला लागले आणि त्यांनी एकमेकांना मिठीही मारली. यानंतर हे दोघेही थेट हॉस्पिटलमध्ये गेले आणि इंजेक्शन घेतले.”
आणखी वाचा – ‘झलख दिखला जा ११’चं विजेतपद पटकावलं, पण अजूनही मनीषा राणीला मिळाली नाही रक्कम, म्हणाली, “बक्षीसाची रक्कम…”
दरम्यान, सैफ अली खान व कमल सदाना हे आता चांगले मित्र असले तरी त्यांच्या नात्याची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण सैफने ‘बेखुदी’मध्ये त्यांची जागा घेतली होती आणि हा त्यांचा पदार्पणाचा चित्रपट होता. अभिनेत्री काजोलनेही या चित्रपटातून पदार्पण केले होते. मात्र नंतर त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली आणि ती आजही तशीच कायम आहे.