अभिनेत्री दीपिका पदूकोण व रणवीर सिंह ही बॉलीवुडमधील एक लोकप्रिय जोडी आहे. दीपिका या वर्षी सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याची बातमी त्यांनी फेब्रुवारीमध्ये चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता दीपिकाचे बाळ या जगात येण्याची आतुरता आता सगळ्यांना लागली आहे. रणवीर व दीपिका यांनी सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. आता त्यांनी मुलाला जन्म देणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अशातच आता दीपिका नक्की मुलाला जन्म देणार की मुलीला याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. (Deepika padukone and ranveer singh baby)
रणवीर व दीपिका पहिल्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहेत. यामध्ये आता ज्योतिषाने एक भविष्यवाणी केली आहे. ‘कोईमोई’च्या एका रिपोर्टनुसार, पंडित जगन्नाथ गुरुजी हे एक प्रसिद्ध सेलिब्रिटी ज्योतिषी व फेस रीडर आहेत. त्यांनी आता एक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी आता रणवीर व दीपिकाच्या घरी कोण जन्माला येणआर याबद्दल भविष्यवाणी केली आहे. त्यांनी दीपिका व रणवीरला मुलगा होणार असल्याचे सांगितले आहे. याआधी देखील या ज्योतिषांनी २०२४ साली दीपिका गरोदर राहणार असल्याचेही सांगितले होते.
त्यांच्या मते दोघांच्याही घरी राजकुमार जन्माला येईल असे सांगितले आहे. या मुलाच्या आगमनाने दीपिका व रणवीरच्या आयुष्यात खूप आनंद येईल असेही सांगितले आहे. दीपिका व रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर दोघेही ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दोघंही एकत्रित काम करताना दिसणार आहेत. तसेच दीपिकाचा नुकताच ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान तिचा बेबी बंपचा लूक पाहायला मिळाला होता.
तसेच रणवीरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, रणवीरचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अजय देवगण, करीना कपूर खान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर असे अनेक कलकार दिसून येणार आहेत.