मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईच्या आठवणीत आस्ताद काळे भावुक, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट, म्हणाला, “दु:ख आहे पण…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 5, 2024 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Aastad Kale shared an emotional post in memory of his mother on her birthday

आईच्या आठवणीत आस्ताद काळे भावुक, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट, म्हणाला, “दु:ख आहे पण...”

आई आणि मुलांचं नातं हे कायमच खास असतं. प्रत्येक मुलासाठी आपल्या आईबद्दल मनाच्या कोपऱ्यात एक हळवा कोपरा असतो आणि हाच हळवा कोपरा रिकामा झाला तर होणारे दु:ख हे न् भरुन येण्यासारखे असते. असंच काहीसं झालं आहे अभिनेता आस्ताद काळेबरोबर. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला मातृशोक झाला होता. या घटनेनंतर भावूक आस्तादने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. आस्ताद आणि त्याच्या आईचे नाते हे खुपच घट्ट होते. आस्ताद त्याचे पुर्ण नाव लिहितांनाही आईचे नाव लावतो. त्यामुळे आईच्या जाण्याने आस्तादने फेसबुकवर दोन पोस्ट केल्या होत्या. त्यापैकी एका पोस्टमध्ये “ती गेली… तेव्हा…” तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये “…म्हणुनी …घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून” असे म्हटले होते.

आस्तादने कायमच त्याचे आईवरील प्रेम हे सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले आहे. अनेकदा त्याने त्याच्या आईबरोबरचे खास फोटो शेअर करत त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. अशातच आज आस्तादच्या आईचा वाढदिवस आहे आणि आईच्या वाढदिवसानिमित्त आस्तादने आईच्या आठवणीत एक पोस्ट खास पोस्ट  शेअर केली आहे. या फोटोला त्याने तुझे सब पता है ना मां’ हे गाणं लावलं असून या खास फोटोखाली त्याने “या गाण्यात जे आहे, ते सगळं भूतकाळात म्हणावं लागतं आहे. याचं दुःख आहेच. पण ते वर्तमान आणि भविष्यातही लागू होणार आहे गं” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Aastad Sunita Pramod Kale (@aastadkale)

आणखी वाचा – भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर भारावला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “हार्दिकने माझ्याकडे बघून…”

या फोटोबरोबरच त्याने आईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. या फोटोमध्ये आस्ताद आणि त्याची आई फोटोमध्ये छान स्माईल करत आहेत. या फोटोखाली मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शर्मिला शिंदे, मेघा धाडे, ऋतुजा देशमुख, मेघना एरंडे, माधव देवचके, संग्राम समेळ अशा अनेक कलाकारांनी आस्तादच्या या फोटोखाली आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच आस्तादच्या आईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.

आणखी वाचा – लग्नाच्या वाढदिवशी वैभव मांगले बायकोसह कोकणात करत आहेत एन्जॉय, शेअर केला सुंदर व्हिडीओ, म्हणाले, “आमचं लग्न…”

दरम्यान, मराठी मालिका, चित्रपट व नाटक अशा तीनही माध्यमांत काम करत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’मुळे अभिनेता चांगलाच नावरुपाला आला. तसेच त्याची ‘पुढचं पाऊल’ ही मालिकादेखील चांगलीच लोकप्रिय झाली होती.           

Tags: aastad kaleAastad Kale Mothermarathi actor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Paaru Serial Promo

दारू पिऊन आदित्यने बंगल्याबाहेर घातला धिंगाणा, पारू हे सत्य अहिल्यादेवींसमोर लपवून ठेवू शकेल का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.