बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कधीही स्वयंपाकघरात न गेलेल्या शिवाची अशी होतेय तारांबळ, सिलेंडरही उचलला अन्…; मालिकेचा BTS व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 5, 2024 | 4:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva serial fame Purva Phadke shared a bts video of lifting a cylinder.

कधीही स्वयंपाकघरात न गेलेल्या शिवाची अशी होतेय तारांबळ, सिलेंडरही उचलला अन्...; मालिकेचा BTS व्हिडीओ समोर

झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’, ‘अप्पी आमची कलेक्टर’, सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सारख्या अनेक मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. यापैकी ‘शिवा’ ही मालिकाही सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील शिवा व आशू यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत असून त्यांच्यावर चाहत्यांचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येत आहे. नुकतच मालिकेत दिव्या पळून गेल्याने आता आशुबरोबर शिवाचे लग्न होत असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. यामुळे शिवा व आशू यांच्या मैत्रीत दुरावा आला आहे.  शिवाला आशूबरोबर लग्न करायचे होते, मात्र आशूला हे लग्न करायचे नव्हते. पण त्या दोघांचे लग्न झाले आहे.

आशुबरोबर लग्न झाल्यानंतर शिवाचं आयुष्य पूर्णतः बदललं आहे. हे लग्न शिवा व राम भाऊ सोडून कोणालाच मान्य नसलेलं पाहायला मिळालं. आशुही शिवाला बायकोप्रमाणे वागवत नाहीय. पण शिवा मात्र तिच्या संसारासाठी पूर्णत: प्रयत्न करत आहे. शिवा-आशू यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून ती वाटेल ते करत आहे. अशातच आता या मालिकेच्या पडद्यामागील काही खास व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शिवा गॅसचा सिलेंडर उचलताना दिसत आहे. मालिकेतील शिवा म्हणजेच मुख्य अभिनेत्री पूर्वा फडकेने हा पडद्यामागील खास व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Purva kaushik (@kaushikpurva14)

आणखी वाचा – लग्नाच्या वाढदिवशी वैभव मांगले बायकोसह कोकणात करत आहेत एन्जॉय, शेअर केला सुंदर व्हिडीओ, म्हणाले, “आमचं लग्न…”

पूर्वा फडके ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावबर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती मालिकेतील काही खास क्षणदेखील शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती साडी घालून खांद्यावर गॅसचा सिलेंडर उचलत आहे. सुरुवातीला ती एका दमात सिलेंडर उचलते. मात्र सीनमध्ये सिलेंडर उचलताना तिला कष्ट करावे लागत असल्याचे या व्हिडीओमधून दिसून येत आहे. या व्हिडीओबरोबर तिने “पडद्यामागील दृश्य : अनागोंदी आणि सर्जनशीलता यांचे परिपूर्ण मिश्रण.” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – आईच्या आठवणीत आस्ताद काळे भावुक, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट, म्हणाला, “दु:ख आहे पण…”

दरम्यान, पूर्वाने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. या सीनसाठी पूर्वाने घेतलेल्या मेहनतीबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केलं आहे. “बापरे… पडद्या मागे एवढी मेहनत करावी लागते, खूप मेहनत घेतली आहेस तु पुर्वा या सीनसाठी, गुड जॉब, कमाल” अशा अनेक कमेंट्स करत अनेकांनी पूर्वाचे कौतुक केलं आहे.   

Tags: marathi entertainment newspurva phadkeshiva serial
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Marathi actor Prathamesh Parab made a clock from roses from his varmala video shared on Instagram

प्रथमेशने लग्नातील ‘ती’ गोष्ट अजूनही ठेवली आहे जपून, खास व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, “वरमाला...”   

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.