सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

असं आहे ‘आई कुठे…’ फेम रुपाली भोसलेचं नवीन घर, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, पूजाही करताना दिसली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 5, 2024 | 6:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rupali Bhosale New Home

असं आहे 'आई कुठे…' फेम रुपाली भोसलेचं नवीन घर, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, पूजाही करताना दिसली अन्…

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतंच नवं घर घेतलं आहे. अभिनेत्रीने तिचं नवं घर घेतलं असल्याचा सुंदर असा व्हिडीओ तिने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. अगदी लहानपणापासून स्वतःचं, हक्काचं घर घेण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झालं आहे. घर घेण्यापासून ते घराच्या गृह्प्रवेशापर्यंतच्या प्रोसेसचा फोटो रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपालीच्या संपूर्ण घराची झलक पाहायला मिळत आहे. (Rupali Bhosale New Home)

घराचा सुंदर असा व्हिडीओ शेअर करत तिने खास कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “या जगाच्या पाठीवर कुठे का होईना आपलं स्वतः चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत असं म्हणतात पण एक वेळ अशी येते जेव्हा नियतीच तुमचं पाकीट मारते आणि हे स्वप्न बघायला सुद्धा तुमचं मन धजावत नाही. लहानपणी निसर्ग चित्रातील त्रिकोणी व आयताकृती घर काढताना आपण ज्या स्टेप्समध्ये घर काढतो त्या स्टेप्समध्येच माझं घर पूर्ण होत गेलं. फक्त त्या वेगवेगळ्या स्टेप्स म्हणजे माझ्या आयुष्यातली वेगवेगळी घरं होती. कोऱ्या कागदावर काहीच न काढलेली स्टेपसुद्धा माझ्यासाठी एका वेळेसचं घर होतं कारण तेव्हा आम्ही अक्षरशः रस्त्यावर राहायचो”.

आणखी वाचा – दीपिका पदुकोण व रणवीर सिंगला होणार मुलगा, सेलिब्रिटी ज्योतिषांनी केली भविष्यवाणी, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

“आयुष्यातलं ते पान नवीन आणि कोरं होतं, पण पेन्सिलने चित्र काढण्याची धमक शाबूत होती. त्यानंतर चित्र काढताना आधी आपण केवळ आयताकृती भिंती काढतो, तेसुद्धा एका टप्प्यावरचं माझं घर होतं कारण तेव्हा आम्ही सगळे गोठ्यात रहात होतो. केवळ भिंती, छप्पर असं काहीच नव्हतं. हां शेणाने सारवलेलं अंगण मात्र तेव्हा होतं. मग पुढे चित्रामध्ये त्रिकोणी, कौलारू छत काढलं आणि आम्हाला पत्र्याचं का होईना घर मिळालं. आयुष्य इतक्या ठिकाणी उसवलेलं की त्यापुढे त्या पत्र्यांना असलेल्या भोकांचं ऐवढं काही वाटायचं नाही. फक्त कोणी त्यातून आपल्याला बघू नये म्हणून पहाटे साडेतीनला उठून आंघोळ करावी लागायची”.

आणखी वाचा – कधीही स्वयंपाकघरात न गेलेल्या शिवाची अशी होतेय तारांबळ, सिलेंडरही उचलला अन्…; मालिकेचा BTS व्हिडीओ समोर

“पुढे परिस्थिती थोडी बरी झाल्यावर भाड्याची सतराशे साठ घरं बदलली. त्या सगळ्या प्रवासात अनेकदा या चित्र असलेल्या कागदाचा चोळामोळा करुन, फाडून फेकून द्यावा वाटला. स्वतःचं घर असावं हे स्वप्नच चुकीचं आहे असं वाटायला लागलं पण स्वप्न दाखवणाऱ्याला खचून चालत नाही कारण त्याच्याकडे बघणारे अनेकजण असतात. त्यामुळे मान खाली घालून अथक मेहनत करत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय त्याच्याकडे नसतो. मागची अनेक वर्षे काम करत खाली घातलेली मान मी जेव्हा काही दिवसांपूर्वी वर उंचावून पाहिली आणि लक्षात आलं अरेच्चा चित्र पूर्ण झालं की आपलं. परमेश्वराचे, आईवडीलांचे आशीर्वाद, असंख्य मित्र मैत्रिणी व फॅन्सच्या सदिच्छा यांमुळे मी नवीन घरात आई, बाबा आणि संकेतबरोबर प्रवेश करत आहे. तुम्ही आजवर दाखवत आलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. मनापासून धन्यवाद. आणि आता वेळ आहे पूर्ण झालेल्या चित्रामध्ये मनसोक्त रंग भरण्याची. मग ते रंग सांडून बॉर्डरच्या, कागदाच्या बाहेर गेले तरी किसको है फिकर”. या सुंदर व्हिडीओमध्ये रुपालीचं नवं घर पाहायला मिळालं असून अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Tags: aai kuthe kay kartemarathi actressrupali bhosaleRupali Bhosale New Home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
urmila nimbalkar new post

"स्वयंपाक येत नाही" असं म्हणणाऱ्यांना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेचं रोखठोक उत्तर, म्हणाली, "पहाटे उठून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.