बॉलिवूड चित्रपट ‘राजा हिंदुस्तानी’ने एकेकाळी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली होती. २७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहे. आमीर खान व करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. अभिनय,संवाद, नृत्य तसेच गाणी यांचा आजही एक वेगळा चाहतावर्ग आहे. परदेसी, पुछो जरा पुछो तसेच तेरे इश्क मे नाचेंगे’ ही गाणी आजही चाहते गुणगुणतात. अशातच आता यातील एका गाण्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ‘तेरे इश्क…’ या गाण्याबद्दलचा एक खुलासा या चित्रपटातील एका अभिनेत्रीने केला आहे. (archana puran singh on aamir khan)
या चित्रपटामध्ये आमीर व करिश्मा व्यतिरिक्त कुणाल खेमु, जॉनी लिव्हर, सुरेश ओबेरॉय, नवनीत निशाण, अर्चना पूरण सिंह असे दिग्गज कलाकार होते. यामध्ये अर्चना ही नकारात्मक भूमिकेत असलेली पाहायला मिळाली. तिने आता या गाण्याबद्दलचा खुलासा केला आहे. तिने ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली होती. तिने आमीरने दारु पिऊन हे गाणं शूट केल्याचे सांगितले. तिने सांगितले की, “सुरुवातीच्या काही सीनमुळे तो समाधानी नव्हता. पण तरीही त्याने ते शूट केले”.
पुढे तिने सांगितले की, “मला नक्की नाही सांगता येणार पण मी ऐकलं आहे की त्या चित्रकरणाच्या वेळी आमीर नशेत होता. त्याची खोली माझ्या खोलीच्या बाजूलाच होती. पण तो कधीही माझ्या समोर दारु प्यायला नाही. पण मला असं वाटत की असं करण्यासाठी त्याने काहीतरी प्रयोग नक्की केला असेल. पण मला नक्की वाटतं की तो प्यायला होता”.
आणखी वाचा – कॅन्सरशी झुंज देत आहे हिना खान, अभिनेत्री रुग्णालयात भरती, म्हणाली, “रडायचं नाही असं…”
दरम्यान या चित्रपटासाठी अर्चनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पहिलं आणि शेवटचं नॉमिनेशन मिळाल्याचंदेखील सांगितलं. सध्या अर्चना ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीजनमुळे चर्चेत आली आहे. हे पर्व २१ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.