बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सेटवर दारु पिऊन आला होता आमिर खान, अर्चना पुरण सिंह यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “माझ्या रुमच्या बाजूला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 18, 2024 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
archana puran singh on aamir khan

अर्चना पूरण सिंहने आमीर खानबद्दल केले मोठं वक्तव्य

बॉलिवूड चित्रपट ‘राजा हिंदुस्तानी’ने एकेकाळी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली होती. २७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहे.  आमीर खान व करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. अभिनय,संवाद, नृत्य तसेच गाणी यांचा आजही एक वेगळा चाहतावर्ग आहे. परदेसी, पुछो जरा पुछो तसेच तेरे इश्क मे नाचेंगे’ ही गाणी आजही चाहते गुणगुणतात. अशातच आता यातील एका गाण्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ‘तेरे इश्क…’ या गाण्याबद्दलचा एक खुलासा या चित्रपटातील एका अभिनेत्रीने केला आहे. (archana puran singh on aamir khan)

या चित्रपटामध्ये आमीर व करिश्मा व्यतिरिक्त कुणाल खेमु, जॉनी लिव्हर, सुरेश ओबेरॉय, नवनीत निशाण, अर्चना पूरण सिंह असे दिग्गज कलाकार होते. यामध्ये अर्चना ही नकारात्मक भूमिकेत असलेली पाहायला मिळाली. तिने आता या गाण्याबद्दलचा खुलासा केला आहे. तिने ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली होती. तिने आमीरने दारु पिऊन हे गाणं शूट केल्याचे सांगितले. तिने सांगितले की, “सुरुवातीच्या काही सीनमुळे तो समाधानी नव्हता. पण तरीही त्याने ते शूट केले”.

आणखी वाचा – Video : जिनिलीया देशमुख व तिच्या वहिनीने उचलली बाप्पाची मूर्ती, आरती करत असताना आली नवऱ्याची आठवण, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Archana Puran Singh (@archanapuransingh)

पुढे तिने सांगितले की, “मला नक्की नाही सांगता येणार पण मी ऐकलं आहे की त्या चित्रकरणाच्या वेळी आमीर नशेत होता. त्याची खोली माझ्या खोलीच्या बाजूलाच होती. पण तो कधीही माझ्या समोर दारु प्यायला नाही. पण मला असं वाटत की असं करण्यासाठी त्याने काहीतरी प्रयोग नक्की केला असेल. पण मला नक्की वाटतं की तो प्यायला होता”.

आणखी वाचा – कॅन्सरशी झुंज देत आहे हिना खान, अभिनेत्री रुग्णालयात भरती, म्हणाली, “रडायचं नाही असं…”

दरम्यान या चित्रपटासाठी अर्चनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पहिलं आणि शेवटचं नॉमिनेशन मिळाल्याचंदेखील सांगितलं. सध्या अर्चना ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीजनमुळे चर्चेत आली आहे. हे पर्व २१ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.    

Tags: aamir khanarchana puran singhraja hindustani
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo Varsha Usgaonkar and Nikki Tamboli argument see the details

Bigg Boss कडून घरातील गॅस वापरण्यासाठी मोजकाच वेळ, तारांबळ उडताच निक्की-वर्षा यांच्यामध्ये वाद पेटला कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.