Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता ८ व्या आठवड्याच्या खेळाला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठी सुरु होऊन जवळपास ५० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे दिवसागणिक या खेळाची रंजकता वाढत चालली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दर आठवड्यात बीबी करन्सी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या करन्सीमधून सगळे स्पर्धक अन्नधान्य, लक्झरी प्रॉडक्ट विकत घेतात. पण, या आठवड्यात ‘बिग बॉस’ने एक नवी ट्विस्ट आणला आहे. तो म्हणजे घरातील गॅस कनेक्शन बंद केल्याचे. ‘बिग बॉस’ निक्कीला चहा बनवा असा आदेश देतात. मात्र, खूप प्रयत्न करुनही गॅस पेटत नसते. तेव्हा ‘बिग बॉस’ घरातील गॅस कनेक्शन बंद केल्याचं सांगतात. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
‘बिग बॉस’ने आता गॅस कनेक्शन बंद केल्यामुळे खायचं काय असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण होतो. अंकिता याबद्दल प्रश्न देखील विचारते. शेवटी, ‘बिग बॉस’ नव्या टास्कची घोषणा करत “आता जेवढी बीबी करन्सी तुम्ही कमवाल, तेवढा वेळ कालमर्यादेनुसार तुम्हाला गॅस वापरता येईल” असं सर्वांना सांगतात. त्यामुळे आता घरातील सदस्यांना ठरावीक वेळेपुरता गॅस वापरता येणार आहे. याचाच एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यातून निक्की व वर्षा पुन्हा एकदा भिडणार असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा – Video : जिनिलीया देशमुख व तिच्या जाऊबाईने उचलली बाप्पाची मूर्ती, आरती करत असताना आली नवऱ्याची आठवण, व्हिडीओ व्हायरल
या नवीन प्रोमोमध्ये जान्हवी वेळ लावून गॅस सुरु करत असल्याचे ‘बिग बॉस’ला सांगते. त्यानंतर सर्व गॅस वापरण्यासाठी घाई करतात. यावेळी निक्कीही दिलेल्या वेळेत सर्व किचनमधील कामे करण्यासाठी घाईय करत असते. यावेळी वर्षा उसगांवकर निक्कीला गरम पाण्याविषयीची विचारणा करतात. तेव्हा निक्की त्यांना “गरम पाणी केलं होतं ना?” असं म्हणते. यानंतर वर्षा तिला “तुला राईचा पर्वत करायचा उगाच” असं म्हणतात. त्यांच्या भांडणात अरबाजही मध्ये बोलतो.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात रंगला अनोखा खेळ, प्राणी ओळखताना सूरजची झाली दमछाक, भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?
आता या बाचाबाचीमधून त्यांचा पुन्हा काय नवीन वाद निर्माण होणार का? की दोघींपैकी कुणी आवरतं घेणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दरम्यान, सोमवारच्या भागात या थीमनुसार घरातील सदस्यांना ‘शिकाऱ्याची बंदूक’ हा नॉमिनेशन टास्क देण्यात आला होता. या कार्यात निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज आणि वर्षा हे पाच सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत.