रुपेरी पडद्यावर चमकणारे कलाकार खासगी आयुष्यात कसं जीवन जगतात? याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. पण आता पहिल्यासारखी ही गोष्ट खासगी राहिलेली नाही. सध्या त्यांचे आयुष्य हे आता युट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. सध्या अनेक कलाकार युट्यूबर झाले आहेत. दीपिका कक्करपासून भारती सिंहपर्यंत अनेक कलाकार त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक प्रसंग शेअर करताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. या लिस्टमध्ये आता चित्रपट निर्माती, दिग्दर्शिका फराह खानचे नावदेखील समाविष्ट झाले आहे. फराह अनेक कलाकारांच्या घरातील किचनमध्ये जाते आणि कुकिंग ब्लॉग बनवते. तिच्या या व्हिडीओना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळते. (farah khan on archana puran singh)
फराहचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती अर्चना पूरण सिंहच्या घरी पोहोचली. यावेळी अर्चना यांनी याआधी कधीही जेवण बनवलं नाही हे त्यांनी सांगितले. फराह नुकतीच मढ आयर्लंड येथे राहणाऱ्या अर्चना यांच्या घरी पोहोचली. यावेळी अर्चना व त्यांचे पती परमीत सेठी यांच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी केल्या. तसेच मजा मस्ती व्यतिरिक्त अर्चना यांची मुलं आर्यमान सेठी व आयुष्यमान सेठी यांच्याबरोबरही गप्पा मारल्या. नंतर अर्चना यांचा मुलगा आयुष्यमान जेवण बनवणार असल्याचे फराह यांनी सांगितले.
अर्चना यांनी मुलगा जेवण बनवणार आहे असं सांगितल्यानंतर फराह म्हणाली की, “पहिल्यांदाच चांगलं जेवण बनवणारा एखादा मुलगा आमच्या व्लोगमध्ये जेवण बनवताना दिसणार आहे”. तेव्हा आयुष्यमान लगेच म्हणाला की, “आईने आमच्यासाठी कधीही जेवण बनवलं नाही”. हे ऐकून फराह अर्चनाला चिडवत म्हणाली की, “तरीच तुम्ही एवढे सुदृढ दिसत आहात”. दरम्यान अर्चना व फराह यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
आपल्या हास्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अर्चना पूरण सिंह यांनी यापूर्वी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर बऱ्याच काळापासून त्या कपिल शर्माच्या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसल्या आहे. आजवर त्यांनी सिनेसृष्टीत उत्तम अभिनयशैलीने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. कायमच त्या त्यांच्या हास्याने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसतात.