masaba gupta reveals baby girl name : अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने काही दिवसांपूर्वीच आई झाली असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि तिचे पती सत्यदीप मिश्रा यांनी आई-बाबा झाले असल्याची गुडन्यूज शेअर केली. मसाबा गुप्ता आणि तिचा पती अभिनेता सत्यदीप मिश्रा यांनी गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. अलीकडेच, जोडप्याने त्यांच्या लहान लेकीचे नाव उघड केले. मसाबाने एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिच्या मुलीचे नाव लिहिलेले सोन्याचे ब्रेसलेट पाहायला मिळत आहे.
लेकीबरोबरचा एक फोटो पोस्ट करत तिने मुलीचं नाव आणि त्या नावाचा अर्थ सांगितला. मसाबाने तिच्या लेकीच नाव मतारा असे ठेवले आहे. मसाबाने या पोस्टमध्ये मतारा नावाचा अर्थही सांगितलं आहे. मसाबाने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “माझी मतारा तीन महिन्यांची झाली. हे नाव नऊ हिंदू देवींच्या दैवी स्त्री शक्तींचे प्रतीक असून त्यांची शक्ती आणि बुद्धीमत्ता दर्शवते”. मसाबाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पती सत्यदीपबरोबरचा फोटो पोस्ट करुन तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती.
आणखी वाचा – महाकुंभमेळ्यामध्ये अदा शर्मा करणार लाईव्ह परफॉर्मन्स, शिवतांडव सादर करणार, अभिनेत्रीचं कौतुकास्पद काम
फोटोमध्ये मसाबा तिचा पती सत्यदीप मिश्राबरोबर जमिनीवर बसलेली दिसत आहे. पांढरा गाऊन परिधान केलेली फॅशन डिझायनर, तिच्या पतीच्या खांद्यावर डोके ठेवत आई होणार आसल्याने खूप आनंदी दिसतेय. मसाबा व सत्यदीप यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन ही बातमी दिली होती. तसेच मसाबाची आई नीना गुप्ता यांनी आजी झाल्यावर नातीबरोबरचा एक गोंडस फोटो पोस्ट केला होता. आता लेक तीन महिन्याची होताच मसाबाच्या लेकीचा नामकरण विधी पार पडला आहे.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात डोहाळे जेवण, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांचे जानेवारी २०२३ मध्ये लग्न झाले. मसाबा एक फॅशन डिझायनर आहे आणि सत्यजित अभिनेता आहे. ती शेवटची मॉडर्न लव्ह मुंबईमध्ये दिसली होती. दुसरीकडे सत्यदीप मिश्राने नो वन किल्ड जेसिका या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मसाबा व सत्यदीप या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. काही काळ एकमेकांना डेट केल्यावर दोन वर्षांपूर्वी त्यांनी अगदी साधेपणाने लग्नगाठ बांधली. मसाबाचं पहिलं लग्न मधू मंटेनाशी झालं होतं, तर सत्यदीप मिश्राचं लग्न अदिती राव हैदरीशी झालं होतं.