बाळाची चाहूल ही प्रत्येक आईच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना असते. आई होणं यापेक्षा अभूतपूर्व सुख कुठल्याही स्त्रीसाठी महत्त्वाचं नसतं. गेल्या काही काळात बऱ्याच अभिनेत्रींनी गुडन्यूज शेअर केली होती. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे मोनिका दबडे. स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे लवकरच आई होणार आहे. मोनिकाने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना दिली होती. मोनिकाने पोस्टमध्ये तिचा व तिचा व छोटूशा शूजबरोबरचा फोटो शेअर करत आई होण्याच्या खुशखबरबद्दल सांगितलं होतं. (monika dabde baby shower)
सोशल मीडियावरील या खास पोस्टद्वारे तिने एप्रिल २०२५ मध्ये बाळाचं स्वागत करणार असल्याचं होतं. त्यामुळे मोनिका आता खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार असून नुकतंच तिचं डोहाळे जेवण पार पडलं आहे. मोनिकाने डोहाळे जेवणासाठी खास तयारी केली होती. सुंदर अशी साडी, त्यावर फुलांचे दागिने, नाकात नथ, साडीवर ‘आई’ असं नाव लिहिलेला बॅच असा सुंदर लूक अभिनेत्रीने डोहाळे जेवणासाठी केला होता. तिच्या या खास लूकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोनिकाने तिचा मेकअप केलेल्या मेकअप आर्टिस्टचे कौतुक करताना दिसत आहे.
आणखी वाचा – “एजे तिळासारखे कडू आणि…”, लीलाचा एजेंसाठी हटके उखाणा, म्हणाली, “आमच्या लुडबूड करणाऱ्यांची…”
तसंच पुढे व्हिडीओमध्ये ती असं म्हणते की, “‘ठरलं तर मग’ या मालिकेत मी मोनिका साकारताना एका वेगळ्या रुपात असते. तशाच एका वेगळ्या रुपात मी आता आहे. मला सातवा महिना लागला असून माझं डोहाळे जेवण पार पडणार आहे”. मोनिका मालिकांमध्ये काम करण्याबरोबरच तिच्या युट्युबवरील व्लॉगसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. मोनिका त्याच्या डेली व्लॉगमध्ये रोज वेगवेगळ्या रेसिपी शेअर करत असते. तिने स्वतःला १००० रेसिपी बनवण्याचे चॅलेंज दिले आहे.
दरम्यान, मोनिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. युट्यूबवरील रेसिपीचे अनेक व्हिडीओही ती सोशल मीडियावर शेअर करते. अशातच आता अभिनेत्री डोहाळेजेवणाचे फोटो केव्हा शेअर करणार? यासह ती बाळाला जन्म कधी देणार? याचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.