शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट, आता अशी दिसते अभिनेत्री, नेटकरी म्हणाले, “वहिनी IPL पाहण्यासाठी कधी येणार?”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 28, 2024 | 6:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anushka sharma instagram post

लेकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट, आता अशी दिसते अभिनेत्री, नेटकरी म्हणाले, "वहिनी IPL पाहण्यासाठी कधी येणार?"

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहे. १५ फेब्रुवारी रोजी तिने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अकाय असे ठेवण्यात आले. जवळपास एका महिन्याने अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे अनुष्का पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे तिच्या चाहत्यांनी पाहिल्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान हा फोटो पाहिल्यानंतर ती भारतात परत येण्याच्या चर्चांनादेखील खूप उधाण आले. (Anushka sharma instagram post)

अनुष्काने मुलगा अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच फोटो शेअर केला आहे. पण हा फोटो एका जाहिरातीचा असून तिच्या हातात एक स्मार्टफोन दिसून येत आहे. त्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला असून निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. तसेच केस देखील छोटे आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा शिवसेनेमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निर्णय, म्हणाला, “माझ्या वनवासानंतर…”

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने फोटो शेअर करत, “दिवसाची सुरवात करण्यासाठी यापेक्षा अजून चांगला पर्याय काय असू शकतो”, असे कॅप्शन दिले आहे. खूप दिवसांनी फोटो पोस्ट केल्याने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की, “वहिनी दादाला सांगा केकेआरबरोबर पंगा घ्या…चांगले मनोरंजन होईल”, दूसरा नेटकरी म्हणतो की, “स्टेडियममध्ये आरसीबीला चीयर करण्यासाठी तुमची खूप आठवण येत आहे”, तसेच तिसरा नेटकरी म्हणतो की, “वहिनी, आयपीएल तुमची खूप आठवण काढत आहे”.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’नंतर कुटुंबियांबरोबर असं आयुष्य जगत आहे निलेश साबळे, लेकीचा पहिल्यांदाच दाखवला चेहरा, फोटो व्हायरल

सध्या भारतात आयपीएल मॅच सुरु झाल्या असून विराट भारतात दाखल झाला आहे. पण त्याच्याबरोबर अनुष्का न आल्याने कोहली कुटुंब कायमचे लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मुलाचा जन्म होण्याच्या दोन महिने आधीच अनुष्का व विराट लंडनसाठी रवाना झाले होते. पण दोघांचीही मुलगी वामिका आता तीन वर्षाची झाली आहे. त्यामुळे तिचे नाव शाळेत टाकण्यासाठी अनुष्का व विराट कायमचे भारतात येऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. मुलगा अकायच्या जन्माची बातमी दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली होती.  

Tags: anushka sharmainstagram postpost photovirat kohli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
pariniti chopra instagram story

लग्नाला वर्ष होण्यापूर्वीच परिणीती चोप्रा गरोदर?, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, "प्रेग्नंसी आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.