प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या कार्यकमात एक महत्वाची व्यक्ती म्हणजे या कार्यक्रमाचे लेखक, दिग्दर्शक निलेश साबळे. हटके लिखाण आणि उत्कृष्ट दिग्दर्शन या गोष्टींच्या जोरावर निलेश साबळे यांनी मागील बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तत्पूर्वी निलेश साबळे यांनी हा कार्यक्रम सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. (Nilesh Sable Daughter)
सध्या निलेश साबळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते म्हणजे त्यांच्या लेकीसाठी. या आधी निलेश साबळे यांनी त्यांच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्टमध्ये दाखवला न्हवता. परंतु काही दिवसांपूर्वी होळीच्या मुहूर्तावर निलेश साबळे यांनी कुटुंबाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये निलेश साबळे पत्नी गौरी आणि लेकीसह विविध रंगांमध्ये रंगलेले दिसले. निलेश यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या या फोटोचं कौतुक केलं आहे.
निलेश साबळे हे पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असून अभिनय, लेखन, दिग्दर्शन या गोष्टींमध्ये देखील पारंगत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम मागील बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात निलेश साबळे यांच्यसह भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, अंकुर वाढावे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश शिरसाठ, स्नेहल शिदम यांसारखे हटके विनोदशैली असणारे अनेक कलाकार होते. तूर्तास या कार्यक्रमाने निरोप घेतला असला तरीही हा कार्यक्रम पुन्हा कधी सुरु होणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. (Nilesh Sable Daughter)
या कार्यक्रमाला निरोप देताना एका मुलाखतीत निलेश यांनी सांगितलं होतं,”सध्या माझं एका चित्रपट व वेबसीरिजचं काम सुरु आहे आणि माझी तब्येत हेदेखील एक मुख्य कारण आहे. गेले काही दिवस माझ्या तब्येतीच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत. तर या साऱ्या कारणास्तव मी या शोमधून बाहेर पडलो आहे.” यापुढे निलेशने त्याच्या आगामी कामाबद्दल असं म्हटलं की, “सध्या माझी एका कार्यक्रमातून बाहेर पडलो असलो तरी लवकरच मी नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. मग तो चित्रपट असेल, नाटक असेल किंवा काहीही असेल. तुम्ही आतापर्यंत जे काही अनुभवलं होतं, त्याहीपेक्षा काहीतरी चांगलं आणि छान मी प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे”.