शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पॅनिक अटॅक आल्यानंतर आलिया भट्ट वडिलांकडे धावत गेली मात्र त्यांनी…; अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “त्यांनी मला आठ लोकांसमोर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 20, 2024 | 5:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
alia bhatt on mahesh bhatt

आलियाला पॅनिक अटॅक आला तेव्हा महेश भट्ट यांनी काय केलं?

आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘डार्लिंग्स’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता तिचा ‘जिगरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशातच आता तिच्या बद्दलची एक नवीन माहिती समोर आली आहे. (alia bhatt on mahesh bhatt)

आलियाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने पॅनिक अटॅकबद्दल सांगितलं आहे. यामध्ये तिने सांगितले की, “ ‘स्टुडंट ऑफ…’या चित्रपटाच्या शूटिंगला जाण्याआधी पॅनिक अटॅक आला होता. त्याचवेळी मी वडिलांना फोन केला आणि त्यांनी मला ऑफिसला यायला सांगितले. मला वाटलं ते मला प्रेमाने मिठी मारतील. माझी अवस्था बघून रुममध्ये पूर्ण शांतता होईल. त्यांनी मला आठ लोक असलेल्या रुममध्ये पाठवलं आणि सगळ्यांच्या समोर उभं केलं. नंतर मला कसं वाटत आहे? असं विचारलं.

आणखी वाचा – उमेश कामतने बायकोला दिलं बर्थ डे सरप्राइज, संपूर्ण बेडरुमच सजवला अन्…; प्रिया बापट म्हणाली, “देवाचे आभार कारण…”

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

त्यानंतर आलियाने महेश यांना विचारलं की, “तुम्ही असं का करत आहात? हे चांगलं नाही”, त्यांनंतर महेश म्हणाले की, “बस्स कर”. यावर आलिया म्हणाली की, “मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि तसंच केलं. वडिलांनी जे सांगितलं ते केल्याने मला नंतर चांगलं वाटलं”. हा सगळा प्रकार सुरु होता तेव्हा इम्रान हाशमीदेखील तिथेच उपस्थित होता. त्याने मला सांगितले की, “आलिया तुला प्रत्येक चित्रपटाच्या आधी असंच वाटेल. प्रत्येक सीन करण्याच्या आधी तुझी अशी अवस्था होणार आहे”.

आणखी वाचा – दारु पिण्यासाठी गोविंदाच्या पत्नीने स्वीकारला ख्रिश्चन धर्म, स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या, “येशूंच्या रक्तात वाईन असते म्हणून…”

महेश हे इतर वडिलांसारखे नव्हते असे आलिया म्हणाली. ते रविवारी कधीही तिच्याबरोबर वेळ घालवायचे नाही. अयशस्वी व्हावी असेही तिच्या वडिलांना वाटायचे. अयशस्वी होणे ही चुकीची गोष्ट नसल्याचे त्यांनी मला अनेकदा पटवून दिले होते.

Tags: alia bhattMahesh bhattstudent of the year
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 netizens expressed their displeasurement on Sangram Chougule performance in the house

Bigg Boss Marathi : "संग्राम अरबाज ३ झाला आहे", संग्रामचा खेळ पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले, "त्याला घाबरतो आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.