बॉलिवूडमधील गोविंदा हा लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडले आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये तसेच गंभीर स्वरुपाच्या भूमिका साकरल्या आहेत. मात्र सध्या तो अभिनयापासून दूर असला तरीही तो सोशल मीडियावर मात्र सक्रिय असलेला दिसून येतो. त्याने ८० च्या दशकात मनोरंजनसृष्टिमध्ये पाऊल ठेवले. तसेच १९८७ साली तो सुनीता अहुजाबरोबर लग्नबंधनात अडकला. गेले ४० वर्ष ते एकमेकांबरोबर सुखी आयुष्य जगत आहेत. सुनीता या पहिल्यापासूनच लाईमलाइटपासून दूर असलेल्या पाहायला मिळतात. पण त्यांच्याबद्दल एका गोष्टीचा खुलासा आता झाला आहे. (govinda wife religion)
गोविंदा कितीही कमी बोलणारा असला तरीही पत्नी सुनीता मात्र रोखठोक बोलताना दिसतात. कोणतीही गोष्ट त्या बोलायला घाबरत नाहीत. गेल्या काही वर्षात त्या गोविंदाबरोबर अनेक मुलाखतींमध्ये दिसून येतात. सुनीता यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्या पंजाबी व नेपाळी आहेत. मात्र त्या ख्रिश्चन धर्माचे पालन करताना दिसतात. एका मुलाखतीमध्ये स्वतः धर्म बदल्याबाबतचा खुलासा केला होता. त्यांनी नुकताच ‘टाइमआऊट विथ अंकित’ या पॉडकास्टमध्ये उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, “माझा जन्म वांद्रे येथे झाला. तसेच माझं शिक्षण ख्रिश्चन शाळेत झाल्याने माझे सर्व मित्रमंडळीदेखील ख्रिश्चन होते. येशूच्या रक्तात वाईन असते असं मी लहान असताना ऐकलं होतं. नंतर मी मनातच विचार केला की वाईन म्हणजे दारु. मी हुशार होतेच त्यामुळे विचार केला की दारु पिण्यात काही वाईट नाही आणि थोडीशी दारु मिळावी म्हणून स्वतःला ख्रिश्चन बनवलं”.
पुढे त्यांनी सांगितलं की, “मी आताही ख्रिश्चन धर्माचे पालन करते आणि दर शनिवारी चर्चमध्ये जाते”. त्यांना विचारले की, “या निर्णयामुळे आई-वडील नाराज होते का?”, त्यावर त्यांनी सांगितले की, “त्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हते. तसेच मी दर्गा, गुरुद्वारा व मंदिरांमध्येदेखील जाते”.तसेच त्यांनी गोविंदा व त्यांच्या रहाणीमानाविषयीदेखील सांगितले. त्या म्हणाल्या की, “मी वांद्रा येथील अलिशान भागात राहायचे तर गोविंदा विरार येथे राहायचे. त्यांना माझं शॉर्ट स्कर्ट घालणे पसंत नव्हते. तसेच त्यांच्या आईलादेखील आवडत नसे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी व सासूबाईंसाठी साडी नेसण्यास सुरुवात केली”. दरम्यान आता सुनीता व गोविंदा यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरु असून त्यांना टीना व हर्षवर्धन अशी दोन मुलं आहेत.