आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘डार्लिंग्स’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता तिचा ‘जिगरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशातच आता तिच्या बद्दलची एक नवीन माहिती समोर आली आहे. (alia bhatt on mahesh bhatt)
आलियाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने पॅनिक अटॅकबद्दल सांगितलं आहे. यामध्ये तिने सांगितले की, “ ‘स्टुडंट ऑफ…’या चित्रपटाच्या शूटिंगला जाण्याआधी पॅनिक अटॅक आला होता. त्याचवेळी मी वडिलांना फोन केला आणि त्यांनी मला ऑफिसला यायला सांगितले. मला वाटलं ते मला प्रेमाने मिठी मारतील. माझी अवस्था बघून रुममध्ये पूर्ण शांतता होईल. त्यांनी मला आठ लोक असलेल्या रुममध्ये पाठवलं आणि सगळ्यांच्या समोर उभं केलं. नंतर मला कसं वाटत आहे? असं विचारलं.
त्यानंतर आलियाने महेश यांना विचारलं की, “तुम्ही असं का करत आहात? हे चांगलं नाही”, त्यांनंतर महेश म्हणाले की, “बस्स कर”. यावर आलिया म्हणाली की, “मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि तसंच केलं. वडिलांनी जे सांगितलं ते केल्याने मला नंतर चांगलं वाटलं”. हा सगळा प्रकार सुरु होता तेव्हा इम्रान हाशमीदेखील तिथेच उपस्थित होता. त्याने मला सांगितले की, “आलिया तुला प्रत्येक चित्रपटाच्या आधी असंच वाटेल. प्रत्येक सीन करण्याच्या आधी तुझी अशी अवस्था होणार आहे”.
महेश हे इतर वडिलांसारखे नव्हते असे आलिया म्हणाली. ते रविवारी कधीही तिच्याबरोबर वेळ घालवायचे नाही. अयशस्वी व्हावी असेही तिच्या वडिलांना वाटायचे. अयशस्वी होणे ही चुकीची गोष्ट नसल्याचे त्यांनी मला अनेकदा पटवून दिले होते.