बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. २०२२ साली ती अभिनेता रणबिर कपूरबरोबर लग्नबंधनात अडकली त्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिने राहाला जन्म दिला. २०२३ साली आलिया व रणबीर यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने पहिल्यांदाच माध्यामासमोर आणले. त्यांतर राहाचे अनेक फोटो व व्हिडीओ इंटरनेटवर तूफान व्हायरल झाले. राहा तिचे आजोबा ऋषि कपूरसारखी दिसते असेही अनेकांनी म्हंटले. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये आलिया व रणबीर राहाला घेऊन दिसून आले होते. राहा आता अडीच वर्षाची आहे. अशातच आलियाने आता केलेल्या वक्तव्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिने नुकतीच एक मुलाखत दिली असून ती चर्चेत आली आहे. (alia bhatt on second child)
आलियाने नुकतीच ‘आयकॉन्स ओन्ली’बरोबर संवाद साधला. यावेळी तिने दुसऱ्या बाळाची तयारी यावर दिलखुलासपणे भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “मी खूप साऱ्या चित्रपटांमध्ये काम करणार आहे. एक अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक निर्माती म्हणूनही काम करणार आहे. खूप सारी मुलं असतील. मी खूप फिरणार आहे. एक सुखी आणि शांततेच एक सामान्य आयुष्य जगेन”.
आणखी वाचा -वॉशिंग मशीन, एसी, टीव्ही ते फ्रीज…; सूरज चव्हाण झाला मालामाल, नामांकित कंपनीकडून भेटवस्तू
तसेच तिने राहाबद्दलही भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “भविष्यात मी तिला माझा पहिला चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट दाखवेन. हा चित्रपट लहान मुलंदेखील पाहू शकतात. या चित्रपटातील माझा अभिनय इतका चांगला नव्हता पण गाणी मात्र खूप छान होती. मला वाटत की राहा हे सगळं खूप एंजॉय करेल”.
सध्या तिच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिचा नवीन चित्रपट ‘जिगरा’ प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. यामध्ये तिच्याबरोबर वेदांग रैनादेखील आहे. यामध्ये भावा-बहिणीचं सुंदर नातं दाखवण्यात आलं असून बहीण भावाला वाचवण्यासाठी कोणत्या थराला जाते हेदेखील दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली असून दिग्दर्शक वासन बाला हे आहेत.