Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी ५’ च्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आहे. यानिमित्त त्याच्यावर सध्या सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोढवे गावात अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. एकेकाळी मजुरी करुन जगणारा सूरज आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा लाडका ‘बिग बॉस’ स्पर्धक ठरला आहे. त्याची साधी बोली आणि साधं राहणीमान यामुळे त्याने अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि तो यशस्वी झाला. (Suraj Chavan Electronics Gift)
‘बिग बॉस’च्या घरात त्याने “मी ‘बिग बॉस’ला कधीच विसरणार नाही. आता हा शो संपल्यावर मी बाहेर जाऊन माझं घर बांधणार आणि त्या घराला ‘बिग बॉस’ असं नाव देणार” असं म्हटलं होतं. सूरजच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची… आणि हीच परिस्थिती ओळखत एका नामांकित कंपनीने सूरजला काही भेटवस्तू दिल्या आहेत. एका नामांकित कंपनीकडून सूरजला त्याच्या नवीन घरात लागणाऱ्या घरातल्या ज्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू दिल्या जाणार आहेत.
या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंमध्ये फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या वस्तू त्याला भेट देण्याचा मोठा निर्णय नामांकित इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने घेतला आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार सूरजचा सन्मान करत त्याला या भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बिग बॉस’ विजेता सूरज फार मेहनत करुन या पदावर पोहोचला आहे. त्याला थोडी मदत करायची या विचाराने घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याच्यासाठी पाठवल्या जाणार आहेत.
आणखी वाचा – निया शर्मा Bigg Boss 18 चा भाग का नाही?, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “त्यांनी माझं नाव वापरुन…”
‘बिग बॉस मराठी’चे विजेतेपद जिंकताच सुरजला १४ लाख ५० हजारांचे बक्षीस तसेच पु.ना. गाडगीळ यांच्याकडून १० लाख रुपयांचे वाउचर व एक स्कुटी मिळाली आहे. याशिवाय केदार शिंदे त्याला घेऊन एक चित्रपटही करणार आहेत. या चित्रपटाचा नायक स्वतः सूरज चव्हाणच असेल. तसेच त्याचा लोकप्रिय डायलॉग ‘झापुक झुपूक’ हेच चित्रपटांचे नाव असल्याचे ते म्हणाले होते. अशातच त्याला आता आणखी काही भेटवस्तुदेखील मिळाल्या आहेत.