‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण तरीही चर्चा मात्र कायम आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील टॉप-६ सदस्य खूप चर्चेत आहेत. सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला. काहींनी अभिजीत सावंतच विजेता व्हायला हवा होता, असं म्हटलं. तर काहींनी उपविजेता ठरलेल्या अभिजीतचं अभिनंदन केलं आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेले हे सदस्य चर्चेत आले आहेत. घराबाहेर आल्यानंतर या सर्वच स्पर्धकांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं पाहायला मिळालं. (Bigg Boss Marathi 5 Abhijeet Sawant)
भारतातील पहिला इंडियन आयडॉल असलेला मराठमोळा अभिजीत सावंत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ७० दिवस उत्तम खेळला. त्यानंतर अभिजीत टॉप २ मध्ये पोहोचला. मात्र प्रेक्षकांची मतं सूरजला जास्त मिळाल्याने तो या शोचा विजेता ठरला व अभिजीत उपविजेता ठरला आहे. आता ‘बिग बॉस’ संपल्यानंतर तब्बल ७० दिवसांनी अभिजीत पुन्हा एकदा कामावर परतला आहे. अभिजीत हा इंडियन आयडॉल १ चा विजेता आहे. अनेक गाजलेली गाणी अभिजीतच्या नावावर आहेत. अशातच आता अभिजीत पुन्हा एकदा स्टेजवर परतत त्याच्या गायनाने मंत्रमुग्ध करण्यास आला आहे.
आणखी वाचा – वॉशिंग मशीन, एसी, टीव्ही ते फ्रीज…; सूरज चव्हाण झाला मालामाल, नामांकित कंपनीकडून भेटवस्तू
अभिजीतच्या स्टेज परफॉर्मन्सचा एक व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. नवरात्रोत्सवात अभिजीतने दुर्गा पूजेदरम्यान खास गाण्याची मैफिल भरवली. हा व्हिडीओ शेअर करत तो म्हणाला, “७० दिवसांनंतर, मी स्टेजवर परत आलो आहे. आमची मुंबई येथे शुभ दुर्गापूजेसाठी रिहर्सल सुरु करत आहे. नवीन सुरुवात आणि अंतहीन संगीताबद्दल कृतज्ञ. अधिक अपडेटसाठी संपर्कात रहा”. अभिजीतच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.
‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतरही अभिजीतची एक पोस्ट व्हायरल झाली होती. यांत त्याने असं म्हटलं होत की, “या ७० दिवसांत सर्वांनी मला खूप सपोर्ट केला आणि प्रचंड प्रेम दिलं. तसेच मतंही दिलीत. माझ्या बिग बॉसच्या प्रवासात मला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो,” अशी पोस्ट अभिजीत सावंतने केली आहे. “मंडळी…शब्दात व्यक्त नाही करू शकत मला जे वाटतंय ते…इतके नॉमिनेशन्स इतके वोट्स आणि इतकं प्रेम! एका कलाकाराला फक्त प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा हवा असतो आणि मागच्या ७० दिवसांत तुम्ही सगळ्यांनी तो मला भरभरून दिलात! खूप खूप धन्यवाद!” असं कॅप्शन अभिजीतने या पोस्टला दिलं आहे.