अभिनेत्री ऐश्वर्या राय ही नेहमी अनेक कारणांमुळे चर्चेत असते. आतापर्यंत ऐश्वर्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २००७ साली ऐश्वर्याने अभिषेक बच्चनबरोबर लग्नगाठ बांधली. दोघांनाही आराध्या नावाची मुलगी आहे. ऐश्वर्याच्या मुलीची चर्चादेखील खूप जास्त प्रमाणात होत असलेली दिसून येते. पण गेल्या काही कालावधीपासून ऐश्वर्या व बच्चन कुटुंबामध्ये काहीतरी वाद असल्याचे समोर आले होते. परंतु बच्चन कुटुंबाने आजवर या सगळ्या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यामध्ये आता ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चन यांच्या नात्याबद्दलदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा दिसून आली. याबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (shweta bachchan on aishwarya rai bachchan )
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’मध्ये श्वेता बच्चन गेस्ट म्हणून पोहोचली होती. यामध्ये श्वेताने ऐश्वर्याच्या सवयीबद्दल सांगितले आहे. यामध्ये तिने ऐश्वर्याबद्दल नक्की काय सांगितले आहे? हे जाणून घेऊया. या कार्यक्रमादरम्यान करणने श्वेताला विचारले की, “ऐश्वर्याची कोणती सवय तुला आवडते?”, यावर तिने उत्तर दिले की, “तिने स्वतःचं एक वेगळं अस्तित्त्व निर्माण केले आहे. ती खूप स्ट्रॉंग आहे. ती खूप चांगली आई आहे. मला तिची ही एक गोष्ट खूप आवडते”.
त्यानंतर करणने श्वेताला तिच्या नावडत्या गोष्टींबद्दल विचारले, त्यावर श्वेताने उत्तर दिले की, “ती कॉल्स व मेसेजला काही उत्तर देत नाही”. तसेच तिने सांगितले की, “ऐश्वर्याचे टाइम मॅनेजमेंट खूप सहन करावे लागते”. या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्वेता व ऐश्वर्याचे यांचे एकमेकींशी खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांना अनेकदा पार्टीमध्ये, लंच किंवा डिनरच्या निमित्ताने एकत्रित पाहिले जाते.
दरम्यान ऐश्वर्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती आता कान्समध्ये दिसून आली होती. तिच्या ड्रेसेस् मुळे तिच्या लूकची देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तसेच ती याआधी ‘पोन्नियन सेल्वान’च्या दोन्ही भागांमध्ये दिसून आली होती.