‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजेच मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेशने आजवर त्यांच्या गायन सेवेतून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मुग्धा व प्रथमेशच्या गायनाचे लाखो दिवाने चाहते आहेत. सोशल मीडियावरही ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते. दोघेही नेहमीच काहीना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ‘आमचं ठरलं’ म्हणत थेट प्रेमाची कबुली देत या जोडीने चाहत्यांना सुखद धक्का दिला. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्न सोहळ्यामुळे विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळाले. लग्नानंतर ही जोडी बरेचदा प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली. दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर कोणताच ब्रेक न घेता या जोडीने लगेचच कामाला सुरुवात केलेली पहायला मिळाली. मुग्धा व प्रथमेश दत्तभक्त असून ते कायमच दत्त सेवेत रमलेले दिसतात.
अशातच नुकताच दोघांचा कोकणातील माणगांव येथील दत्तमंदिरात भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या सुमधुर गायनसेवेने उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन सोडलं. यावेळी मुग्धा व प्रथमेश यांच्या साध्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधलं. मुग्धाने अत्यंत साधेपणामध्ये या कार्यक्रमाला हजेरी लावली. निळ्या रंगाची काठापदराची साडी मुग्धाने नेसली होती. त्यावर मंगळसूत्र व नाजूक अशी मोत्याची माळ लक्षवेधी ठरली. शिवाय हातातील हिरव्या बांगड्या व सोन्याच्या पाटल्याही लक्षवेधी ठरल्या असून त्यांचा साधेपणा दाखवत आहेत.
‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे चाहते आहेत. अशातच ही जोडी महाराष्ट्राबाहेरच्या प्रेक्षकांना त्यांच्या गाण्यांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी जात असते. शिवाय दोघांनाही दत्तगुरुंचं वेड असून दत्तभक्त असल्याचंही अनेकदा शेअर केलेल्या व्हिडीओमधुन पाहायला मिळालं आहे.