टेलिव्हिजन विश्वात तसेच बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत काम करत असताना खूप प्रसिद्धी मिळवली. मात्र कालांतराने या अभिनेत्री त्यांच्या संसारात रमल्या वा काहींनी लग्नानंतर यशस्वी करिअरला रामराम ठोकला. तीन वर्षे एअर होस्टेस म्हणून काम केल्यानंतर अभिनेत्री दीपिका कक्करला वयाच्या २४व्या वर्षी ‘नीर भरे तेरे नैना देवी’ या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात ब्रेक मिळाला. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या लोकप्रिय मालिकेमधून अभिनेत्रीला रातोरात प्रसिद्धी मिळाली. (Dipika kakar Income)
दीपिका कक्करने ‘ससुराल सिमर का’ मालिकेमध्ये जवळपास सहा वर्षे काम केले. या मालिकेनंतर ही अभिनेत्री सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक बनली. रिपोर्ट्सनुसार, दीपिका तिच्या काळात प्रति एपिसोड ७०,००० रुपये इतके मानधन घेत होती. दीपिकाचे लग्न २०११ मध्ये रौनक सॅमसन यांच्यासह झाले होते. पण चार वर्षांनी दोघांनाही घटस्फोट घेत त्यांनी हे नातं संपवलं.
घटस्फोटानंतर दीपिका शोएबच्या जवळ आली आणि त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली. शोएबने मालिका सोडल्यानंतर दीपिकाला तिच्या प्रेमाची जाणीव झाली. मग एके दिवशी दोघांनीही आपलं प्रेम व्यक्त केलं. जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१८ साली लग्न केले. शोएबबरोबर लग्न करण्यासाठी दीपिकाने इस्लामचा स्वीकार केला होता. त्यामुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात आले.
दीपिका फैजा बनल्यानंतर ही अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. दीपिका रिॲलिटी शो ‘बिग बॉस १२’ची विजेती देखील आहे. दीपिका बऱ्याच दिवसांपासून सिनेविश्वापासून गायब आहे. दीपिका कक्कर अभिनयापासून दूर असली तरी ती तिच्या व्हिडीओद्वारे तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. दीपिका व शोएबने २०२३मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. दीपिका व शोएब आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट व्हिडीओद्वारे चाहत्यांशी शेअर करत असतात. चाहतेही या जोडीवर भरभरुन प्रेम करताना दिसतात.