बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या खूप चर्चेत आहे. दीपिका व रणवीरच्या घरी गणपतीच्या शुभ मुहूर्तावर चिमुकलीचे आगमन झाले. आई-बाबा झाल्याची माहिती दोघांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दिली. अशातच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रणवीर व दीपिकाने मुलीचे नाव ठेऊन त्याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांनी आपल्या गोंडस मुलीचे नाव दुआ असे ठेवले. त्यानंतर अनेकांनी दीपिका व रणवीरला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि नावाचे कौतुकदेखील केले. याबरोबरच मुलीच्या जन्मानंतर दीपिका सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेलीदेखील दिसते. बाळ घरी आल्यानंतर नक्की काय अवस्था असते आणि आई कोणत्या परिस्थितिमधून जाते याबद्दलचे व्हिडीओ व तसेच फोटोदेखील शेअर करत असते. (deepika padukone daughter latest photos)
मुलीच्या जन्मानंतर दीपिका पाहिल्यांदाच समोर आली आहे. रणवीर व दीपिका मुलगी दुआबरोबर कलिना येथील खासगी विमानतळावर जाताना दिसून आली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दीपिकाने दुआला छातीशी पकडलं आहे. तसेच दोघांनीही माध्यमांसमोर आपला चेहरा दाखवला नाही. दोघंही एकदम साध्या वेशामध्ये दिसून आली. तसेच आई झाल्यानंतरचा ग्लो दीपिकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
दीपिका व रणवीरचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण दीपिकाचे कौतुकदेखील करत आहेत. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “दीपिकाने किती प्रेमाने तिच्या मुलीला छातीशी पकडलं आहे”, तसेच अजून एकाने लिहिले की, “दीपिका स्वतःच्या मुलीची स्वतः काळजी घेत आहे हे बघून छान वाटलं”. दीपिका व रणवीरचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगबद्दल बोलायचे झाले तर दोघेही लवकरच त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. दीपिका पदुकोणच्या ‘कल्की’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. कल्कीच्या वेळी दीपिका पदुकोण प्रेग्नंट होती आणि तिच्या प्रेग्नेंसीबरोबरच तिने चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भाग घेतला होता. अशातच आता दोघे जण ‘सिंघम अगेन’मधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.