सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गेली पाच वर्ष…”, मालिकेला निरोप देताना मधुराणीने अरुंधतीसाठी लिहिलं भावुक पत्र, म्हणाली, “तुझ्यामुळे मला…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 8, 2024 | 2:46 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Madhurani Prabhulkar Write Emotional Letter to Arundhati

‘आई कुठे काय करते’ मालिका फेम मधुराणी प्रभुलकर गोखलेने अरुंधती पात्रासाठी लिहिलं भावुक पत्र

मराठी मालिकाविश्वातीत लोकप्रियतेचं शिखर गाठवणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’ मालिका. २०१९पासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यानंतर तब्बल पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचा चांगलाच खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. पण गेल्या काही महिन्यांपासून मालिकेतील सातत्याने बदलणारे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड रंटाळवाणे वाटले. त्यामुळे प्रेक्षक ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद करण्याची मागणी करत होते. (Madhurani Prabhulkar Write Emotional Letter to Arundhati)

काही महिन्यांपूर्वी मालिकेची वेळ बदलण्यात आली. दुपारी २.३० वाजताची वेळ ‘आई कुठे काय करते’ मालिकेला देण्यात आली. पण, आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच ती महाराष्ट्राची लाडकी आई ठरली. त्यामुळे आता या महाराष्ट्राच्या लाडक्या आईला निरोप देताना स्वत: अरुंधती भावुक झाली आहे. मालिका बंद होत असल्यामुळे मधुराणीने अरुंधतीसाठी एक भावुक पत्र लिहिलं आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मधुराणीने अरुंधतीसाठी भावुक पत्र लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : लीलाच्या हट्टामुळे एजे साजरी करणार दिवाळी, अंतरानंतर पहिल्यांदाच होणार पाडवा, दोघांचे नातं फुलणार

यावेळी पत्राचं वाचन करत मधुराणी म्हणाली की, “प्रिय अरुंधती, खरंतर आता मी भावनाविवश झाली आहे. गेली पाच वर्ष तू आणि मी जणू एकरुप झालो. किती दिलं आहेस तू मला. किती शिकवलं आहेस.  स्वत्वाची जाणीव करुन दिली आहेस. स्वाभिमान शिकवला आहेस, आत्मभान दिलं. स्वतःसाठी उभं राहण्याचं बळ दिलं आणि साहसही दिलं आहेस. तुला (अरुंधतीला) निभावताना माझी मी पाझरत राहिले आणि मी माझी मला नव्याने सापडले. माझ्या घडण्यात तुझा किती मोठा वाटा आहे, हे कसं सांगू तुला?”

आणखी वाचा – “रिटायर झालो होतो पण…”, ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचे स्वत:च्या भूमिकेविषयी भाष्य, म्हणाले, “काही महीने घरी…”

यापुढे ती असं म्हणाली की, “तुझ्यामुळे मला मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, स्नेह मिळाला. तुझ्यामुळे माझं अनुभवविश्व कितीतरी समृद्ध झालं. आत्मा जसा एक देह त्याग करुन दुसरा देह आपलासा करतो, तशी ही मधुराणी दुसऱ्या देहाच्या शोधात असेल. पण, तुझ्याबरोबर प्रवासातल्या आत्म्यावर उमटलेल्या खोलवरच्या खाणा-खुणा असतीलच. ती जगाकडे आणि स्वतःकडे तिच्याबरोबरच तू दिलेल्या दृष्टीतूनच बघेल.”

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
urvashi rautela troll

स्टायलिश ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाचा नको तो अवतार पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, "फाटके कपडे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.