बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या खूप चर्चेत आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. २०१० साली त्याचा ‘सिंघम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली होती. आज इतकी वर्ष उलटून गेली तरीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री काजल अग्रवाल ही मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच या चित्रपटातील सर्व गाणीदेखील प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यानंतर या चित्रपटांचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सर्वच भाग तूफान चालले आहेत. अशातच आता ‘सिंघम’चा अजून एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला असल्याची चर्चा सर्वत्र रांगली होती. (singham again box office collection)
काही दिवसांपूर्वी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा धमकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ट्रेलर पाहून सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच १ नोव्हेंबर २०२४ हा चित्रपट देशांत सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पहिल्या काही दिवसांत या चित्रपटाने चांगली कमाई केली. मात्र नंतर य चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची जादू कमी झालेली पाहायला मिळाली.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने शुक्रवारी म्हणजे आठव्या दिवशी केवळ ७.५० कोटी रुपयांची कमाई केली. एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी ८.७५ कोटी रुपये कमावले होते. त्याआधी बुधवारी १०.५० कोटी, मंगळवारी १४ कोटी, सोमवारी १८ कोटी, रविवारी ३५.७५ कोटीव शनिवारी ४२.५० कोटी रुपये कमावले होते. मात्र आता हा आकडा कमी असून ‘सिंघम अगेन’ची हवा कमी झालेली पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची एकूण कमाई १८०.५० कोटी रुपये झाली आहे.
‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे एकूण बजेट ४०० कोटी रुपये इतके आहे. हा चित्रपट हिट होण्यासाठी देशात कमीत कमी ४२५-४३० कोटी रुपयांची कमाई करणे गरजेचे आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने भारतात १७३ कोटी रुपये कमावले. पण सध्याची स्थिती पाहता दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट ३०-४० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करु शकणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.